(करमाळा_चौफेर लिंगेश्वर गोमे)
करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डुवाडी येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी यास मान्यता देण्यात आल्यानंतर आता तेथील पदांनाही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की कुर्डुवाडी येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी यासाठी एकुण सोळा पदांची निर्मिती केली आहे. यात नियमित (अस्थायी) पदांची संख्या बारा इतकी आहे. यामध्ये एक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) हे पद आहे.
तसेच सहाय्यक अधीक्षक (१), लघुलेखक ग्रेड तीन (१), वरिष्ठ लिपीक (२), कनिष्ठ लिपिक (४), बेलीफ (३)या पदांचा समावेश आहे. तसेच बाह्य यंत्रणेचा वापर करुन घ्यावयाच्या मनुष्य सेवेतील पदे सुध्दा भरली जाणार आहेत. यात शिपाई (२), पहारेकरी (१), व सफाईदार (१) या पदासाठी भरती केली जाणार आहे.यामुळे लवकरच या पदासाठी भरती केली जाणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
