करमाळा चौफेर
मौजे आवाटी ता.करमाळा येथील कु. मनिषा सविता मोहन खताळ हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची दुय्यम निबंधक तथा सहाय्यक महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे मुलींच्या गटातून ती राज्यात तिसरी आली असून तिने आवाटी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आवाटी ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी दीपक शिंदे, साजिद मुलानी, बाबू मुलानी, ताहेर खान, गणेश शिर्के, नानासाहेब खताळ यांच्यासह ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.जिद्द , चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश भेटते स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मनिषा खताळ यांनी सांगतीले
