July 30, 2026
IMG-20260729-WA0079

करमाळा_चौफेर (  शंभू फरतडे)

आजच्या डिजिटल युगात फसवणूकीचे अनेक फंडे सुरू आहेत. पैसा व स्वार्थापायी माणसाची पातळी घसरत असताना करमाळा तालुक्यातील एका युवकाने प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे. हॅकरने ट्रॅक लावून लुटलेले तब्बल 30 हजार रुपये नेवासा तालुक्यातील व्यक्तीला रोख स्वरूपात परत केले आहेत .वीट ता.करमाळा जय महाराष्ट्र उद्योग समुहाचे तेजस रघुनाथ ढेरे यांच्या प्रमाणिक पाणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ●कसा घडला ट्रॅप●

अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील मजुरी करून उदरनिर्वाह करणारे जालिंदर मच्छिंद्र भागवत यांना हॅकरचा फ्रॉड कॉल आला.त्यांना तुमच्या फोन वर चुकून 35000 हजार आले आहेत असे सांगतीले व 35 हजार क्रेडीट चा फेक मेसेज देखील देण्यात आला. भागवत यांनी खातरजमा न करता ते पैसे परत केले. नंतर दुसर्‍या दिवशी तसाच प्रकार घडला व तीस हजार तेजश ढेरे यांच्या नंबरवर पाठवण्यास सांगतीले.●भागवत यांना तेजश ढेरेंचा नंबर का दिला?●

भागवत यांना तेजश ढेरे यांच्या नंबरवर पैसे पाठवण्यास सांगतीले कारण त्याच दिवशी करमाळ्याचे तेजेश रघुनाथ ढेरे यांनाही हॅकरचे फ्रॉड कॉल आले. व तेजश ढेरे यांची सर्व कुंडली त्यांच्याकडे होती.ढेरे यांचा बोरवेल व्यवसाय असल्याने आमची गाडी तुमच्याकडे चालेल का? वैगेरे म्हणून ओळख करून घेतली . व आमचे एक जणाकडे पैसे अडकले आहेत तुमच्यावर खात्यावर पाठवेल नंतर आम्हाला द्या असे सांगतीले. व तेजश ढेरे यांना ५० हजार क्रेडीट चा फेक मेसेज आला. ●ढेरे देखील फसता फसता वाचले व शहाणपण सुचले●

५० हजार क्रेडीट चा मेसेज जमा झाल्यावर ढेरे यांना एक सॅक्कनर आला मात्र ढेरे यांच्या खात्यातव बॅलन्स नसल्याने पैसे ट्रान्सफार्मर झाले नाहीत त्या क्षणी हा ट्रॅप असल्याचे ढेरे यांच्या लक्षात आले.ढेरे यांच्या खात्यावर जर जास्त बॅलन्स असता तर पैसे कट झाले असते परंतू सुदैवाने दुसऱ्या खात्यावर बॅलन्स असल्याने ढेरे यांची फसवणूक टळली.इकडे जालींदर भागवत मात्र हॅकर च्या जाळ्यात अडकले होते एका नंबरवर त्यांनी ३५ हजार पाठवले देखील व दुसर्‍या दिवशी हॅकर ने ३० हजार क्रेडीट चा फेक मेसेज जालिंदर भागवत यांना पाठवला व पुन्हा पैसे चुकून तुमच्या खात्यावर आले आहेत या नंबरवर पाठवा म्हणून तेजश ढेरे यांचा नंबर दिला व भागवत यांनी देखील खातरजमा न करता पैसे तेजश ढेरे यांच्या नंबरवर पाठवले.मात्र दोन दिवसांनी जालिंदर भागवत यांनी आपल बॅंक बॅलन्स चेक केल्यावर खात्यावरचा आपलाच बॅलन्स कट झाल्याचे लक्षात आले.नंतर बँकेत जाऊन त्यांनी स्टेटमेंट काढले असता तेजश ढेरे यांचा फोन पे क्रमांक मिळाला .●दुसर्‍याच दिवशी दुसरा ट्रॅप पण ढेरे यांची हुशारी●

भागवत यांनी तेजश ढेरे यांच्या खात्यावर रक्कम जमा करताच हॅकर ने तेजेश ढेरे यांना फोन करून आलेले पैसे पाठवण्यास सांगतीले मात्र ट्रॅप लक्षात आलेल्या ढेरे यांनी ज्या खात्यावरून पैसे आले आहेत त्याच खात्यावर जमा करणार असल्याचे सांगतीले. यानंतर हॅकर यांनी ढेरे यांना धमक्या व शिवीगाळ सुरू केली. यानंतर ढेरेनीं हॅकरचा नंबर ब्लॉक करून निनावी नंबरवरील काॅल घेणे टाळले.मात्र “ज्याचे पैसे आहेत त्यांनाच देणार” हे ठरवून तेजेश यांनी भागवत यांच्या फोनची वाट पाहिली. आठदिवसानंतर काल भागवत यांचा फोन आला त्यानंतर भागवत यांना करमाळा येथे बोलावून जेष्ठ पत्रकार डाॅ बाबूराव. हिरडे दै सामना चे शंभूराजे फरतडे यांच्या हस्ते करमाळा येथे ती रोख 30 हजारांची रक्कम भागवत यांना सुपूर्द केली.

“माझे ३५ हजार गेले मात्र तेजश ढेरे यांच्या प्रमाणिक पणा मुळे तिस हजार परत मिळाले .मि त्यांना पाच हजार बक्षीस देऊ केले ते सुद्दा त्यांनी घेतले नाहीत. माझी परस्थीती मध्यम आहे., “मी एवढी वर्षे वारी केली, ती आज सार्थक झाली.”तेजश ढेरे यांच्या रुपाने गुरुपौर्णिमेनिमे दिवशी पांडुरंग भेटला – जालिंदर भागवत – (सलाबतपूर ता. नेवासा)● 

“कोणी काहीही म्हणो, मी माझा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही. माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही.” त्यांच्या कष्टाचे पैसे होते ते मी परत केले याचे मोठे समाधान आहे.(तेजेश रघुनाथ ढेरे-  करमाळा)

●ऑनलाईन व्यवहार करताना सावधान असावे●

सध्या ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीची प्रकरणं वाढत आहेत. बॅंकेच्या अधिकृत ॲप वरूनच व्यवहार करावेत.फोन वर आलेले ओटीपी ,किंवा इतर लिंक ओपन करू नये .अनोळखी लोकांशी व्यवहार करणे टाळावे. -डाॅ बाबूराव हिरडे (सामाजिक कार्यकर्ते करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *