करमाळा_चौफेर (संभाजीनगर प्रतिनीधी )
“नौकरी मागणारा नाही, तर नौकरी देणारा समाज घडवायचा” या ध्येयाने सुरू झालेली मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशनची चळवळ आज महाराष्ट्रभरातील उद्योजकांना एकत्र आणणारे एक भक्कम व्यासपीठ बनत आहे. अल्पावधीतच हजारो उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकत्र जोडत या संघटनेने व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकीची अनोखी परंपरा निर्माण केली आहे.
काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हॉटेल सयाजी इन येथे मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशनची सहावी मासिक बैठक मेळावा अत्यंत उत्साहात पार पडली. तब्बल १७५ सदस्यांची उपस्थिती लाभलेल्या या बैठकीत व्यवसाय, संघर्ष, जिद्द आणि यशाचे अनेक प्रेरणादायी अनुभव सदस्यांसमोर मांडण्यात आले. बैठकीस मुख्य संस्थापक अध्यक्ष विनोद बढे दादा, प्रदेशाध्यक्ष वैभव फरतडे उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अजय महाजन, स्विफ्ट टेक्नॉलॉजीचे कृष्णा मराठे सर, हॉटेल मलबेरी इनचे सर्वेसर्वा अजय शिंदेदादा , सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे वॉटर पार्क मधुरा गार्डन चे सर्वेसर्वा महेश सावंत , राजेंद्र पवार गुरुकृपा फरसाण चे सर्वेसर्वा, प्रशांत पवार वक्ता लेखक तसेच संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ दादा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमहापौर श्री राजेंद्र जंजाळ दादा यांनी मराठा उद्योजक लॉबी चे अनोख्या शब्दात कौतुक केले मराठा आणि व्यवसाय हे एकमेकांचे विरोधी गोष्टीला तुम्ही एकत्र आणले हे खूप जबरदस्त काम केले आहे, जेव्हा जेव्हा मराठा उद्योजक लॉबी साठी माझी गरज लागेल मी नेहमीच उभा असेल आणि हे राजकारणी भाषण नाही तर माझा शब्द आहे.
या वेळी सेलू (परभणी) येथील सायकल उत्पादक विलास शिंदेदादा यांनी केवळ वीस हजार रुपयांत सुरू केलेला व्यवसाय आज तीन राज्यांसह नेपाळपर्यंत कसा पोहोचला याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. तर टेंभुर्णी येथील प्रसिद्ध हॉटेल न्यू राजवीर(टेंभुर्णी) चे मालक सोनाजी महाडिक दादा यांनी संघर्षातून उभा केलेला व्यवसाय आणि त्यातून मिळवलेले यश याबद्दल मनोगत व्यक्त करत उपस्थित तरुणांना मोठी प्रेरणा दिली.

विशेष म्हणजे मराठा उद्योजक लॉबी ही केवळ बैठका घेणारी संघटना नसून “एकमेकांना साथ देणारे कुटुंब” म्हणून आज ओळख निर्माण करत आहे. अनेक छोट्या उद्योजकांना ग्राहक, नेटवर्क, मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्याचे मोठे कार्य या संघटनेमार्फत सुरू आहे. अनेकांच्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यवसायांना नवसंजीवनी देण्याचे काम लॉबीच्या माध्यमातून झाले आहे. आज ग्रामीण भागातील तरुण स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक महिला उद्योजिकांनाही या व्यासपीठामुळे आत्मविश्वास मिळत आहे. “आपला माणूस आपल्या पाठीशी आहे” ही भावना मराठा उद्योजक लॉबीच्या प्रत्येक बैठकीत अनुभवायला मिळते. संभाजीनगर टीमचे जिल्हाध्यक्ष सारंगदादा बोरडे , अरविंद साळुंखे दादा,सुनील जाधव, बळीराम फुके , सतीश घुले, कुंदन पाटील, संतोष गावंडे, गणेश चव्हाण, श्रीराम पाटील या सहकाऱ्यांनी या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले होते. बैठकीत आयोजित लकी ड्रॉच्या माध्यमातून दोन जोडप्यांना हॉटेल मलबेरी इन येथे स्टे कूपन , मधुरा गार्डन वॉटर पार्क चे कूपन, तसेच सायकल व तीन व्यासायिकांना वेबसाईट टेक सुर्या तर्फे विनामूल्य देऊन सन्मानित करण्यात आले. व्यवसाय, मैत्री, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम म्हणजे मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशन, अशी भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. “एकत्र येऊ… व्यवसाय वाढवू… समाज घडवू…” या ब्रीदवाक्यासह मराठा उद्योजक लॉबीची वाटचाल दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून भविष्यात महाराष्ट्रातील उद्योजकतेचे मोठे आंदोलन म्हणून ही संघटना ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमासाठी संभाजीनगर ची देवगिरी बँक तसेच कृष्णा मराठे सर यांनी स्पॉन्सर स्वरूपात मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार
