November 10, 2026
IMG-20261110-WA0062(1)

करमाळा चौफेर

घोटी (ता. करमाळा) येथे दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाबाबत लाभार्थी गावांतील शेतकरी बांधवांची विचारविनिमय बैठक मा. आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेत आवर्तन सुरू होण्यास होणारा विलंब, पाणी वितरणातील अनियमितता, लाभार्थी गावांना मिळणारे असमान पाणी, नियोजनाचा अभाव तसेच संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आवर्तनाअभावी उभ्या पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावरही सविस्तर चर्चा झाली.यावेळी बोलताना संजयमामा शिंदे यांनी, आपल्या कार्यकाळात योजनेला प्रशासकीय मान्यता, आवश्यक निधी आणि वीजबिलासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगितले. यापुढेही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून आवर्तन लवकर सुरू करण्यासाठी आणि सर्व लाभार्थी गावांना समान न्याय मिळेल, असे पाणी वितरणाचे नियोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.या बैठकीस सुभाष आबा गुळवे, ॲड. अजित विघ्ने, भरत भाऊ अवताडे, सतीश बागल, रवींद्र वळेकर, विलास काका राऊत, अंगद पाटील, धनाजी ननवरे, तात्यासाहेब मस्कर, बाळासाहेब राऊत पाटील, नानासाहेब लोकरे, राजेंद्रकुमार बारकुंड, चंद्रहास निमगिरे, चंद्रकांत सरडे, तानाजी झोळ यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *