August 19, 2026
IMG-20260817-WA0023

करमाळा_चौफेर  नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्लोबल फाऊंडेशन संचलित पवार जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य ऑर्थोपेडिक व दंत चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत पवार जनरल हॉस्पिटल, बस स्टँडजवळ, करमाळा, जि. सोलापूर येथे होणार आहे. या शिबिरातील तपासणी पूर्णपणे मोफत असून औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत.

👇🏻 शिबिरात उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर👇🏻

 ●ऑर्थोपेडिक विभाग● 

1. डॉ. पाटील विश्वजीत विजय – MBBS, MS ORTHOPAEDICS, FIRAA, FIA, FICAA, FIAR  पाटिल ॲक्सिडंट हॉस्पिटल, अहिल्यानगर-    सेवा: गुडघा बदल, खुबा बदल, फ्रॅक्चर, इम्प्लांट काढणे, मणक्याचे आजार

2. डॉ. राऊत अविनाश – MBBS, http://D.ORTHOPEDIC सेवा: हाडांचे उपचार, संधिवात, सांधेदुखी, कंबरदुखी, सायटिका, हात-पाय दुखणे

●दंत विभाग● 

डॉ. राऊत श्वेता – BDS  सेवा: रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, कवळी बसवणे, दात सरळ करणे, दात भरणे, दातांची स्वच्छता

●हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधा● पवार जनरल हॉस्पिटलमध्ये 40 बेड, 24×7 आपत्कालीन सेवा, ICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, CT Scan, डिजिटल X-Ray, ऑटोमॅटिक पॅथॉलॉजी लॅब आणि फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत उपचार देखील केले जातात.संपर्क:+91 99502 57373  

ठिकाण: पवार जनरल हॉस्पिटल, बस स्टँडजवळ, करमाळा

ग्लोबल फाऊंडेशन आणि पवार जनरल हॉस्पिटलच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *