August 20, 2026
IMG-20260820-WA0057(1)

करमाळा तालुक्यात अनाधिकृत बोगस डिपी बसवूण शेतकऱ्यांसह महावितरण व शासनाची ची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांचा घोटाळा उघड करण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी करमाळा व जेऊर महावितरण ला उपोषणाचा इशारा दिला होता .उपोषण मागे घेण्याची विनंती करून संबंधित डिपींचे सर्वेक्षण करून ठेकेदारांवर कारवाई करण्याचे महावितरण कडून लेखी पत्र दिले होते मात्र केवळ कोळगाव सबस्टेशन अंतर्गत डि पीं वर कारवाई केल्याचे दाखवून तालुक्यातील पश्चिम भागातील लाखो रूयांचा डि पी घोटाळा दाबण्याचे काम महावितरण चे अधिकारी करत आहेत असा आरोप फरतडे यांनी केला आहे.कोटेशन देण्याचे बंद असताना कोणतेही कागदपत्रांची पूर्तता न करता एक दोन लोकांसाठी डि पी बसवनू दिला जातो या बदल्यात शेतकऱ्यांकडून दोन ते अडीच लाख रू उकळले जातात. तसेच कमर्शियल मधून देखील शेतीपंपाना वीज जोडणी दिली जात आहे.  शेतकऱ्यांच्या पैशावर उभा केलेल्या डि पी ला शासकीय मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हापरिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिति ,आमदार खासदार यांच्या शिफारशी घेऊन पुन्हा लाखो रू यांची बीले काढली जात आहेत. तिन लाखांपर्यंत खर्च येणाऱ्या डि पी शासकीय किमंत १५ लाखांपर्यंत वाढवून दाखवून अधिकारी व ठेकेदार पैसे उकळतात अशी शंका देखील फरतडे यांनी व्यक्त केली असून चालू वर्षांत डि पी डि सी अंतर्गत झालेल्या डि पीं ची मंजुरी पत्र, शिफारस, काम सुरू झाल्याची व पुर्ण झाल्याची तारीख याची तपासणी करावी अशी देखील मागणी फरतडे यांनी केली आहे.आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर फक्त ठराविक भागातील डि पी सोडवून शेतकऱ्यांना त्रास देण्या ऐवजी बोगस व विनापरवाना डि पी बसवणार्‍या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व लायसन्स रद्द करण्याची हिम्मत महावितरण ने दाखवली पाहिजे किंवा ठेकेदार व अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याचे तरी मान्य करावे असे फरतडे यांनी म्हटले आहे .बोगस डिपीचा खरा घोटाळा हा पश्चिम भागात असून बॅक वाॅटर मधील एका गावात पंचविस बोगस डिपी बसवले असून लाईनम झिरो लाईनम यांनी करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे. व यांना महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा पश्चिम भागातील गावात आहे. सबळ पुराव्यानिशी हा घोटाळा सिद्ध करू असा देखील इशारा फरतडे यांनी दिला आहे.ठराविक गावात कारवाई न करता करमाळा तालुक्यातील विना परवना सर्व डिपींची माहिती संकलित करून संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी , डि पी सोडल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दुप्पट रक्कम व डि पी साठी घेतलेले पैसे ठेकेदाराकडून वसूल करून शेतकऱ्याना परत करण्यात यावेत या मागणी साठी बुधवार दि. मंगळवार दि.२५ ऑगस्ट पासून करमाळा व जेऊर महावितरण विरोधात जेऊर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा फरतडे यांनी दिला आहे ठेकेदार व डिपी देखील बोगस?

महावितरण कार्यालयाने लेखी पत्र दिल्या शिवाय कंपनी डिपी देत नाही परंतु ज्यांच्याकडे डिपी बसवण्याचं लायसन्स नाही अशा लोकांनी देखील शेतकऱ्यांकडून लाखो रूपये घेऊन बोगस डिपी बसवले आहेत .जुण्या डिपीला रंगरंगोटी करून डुप्लिकेट कंपनी नेमप्लेट लावून यांना डिपीचा पुरवठा होत असल्याची शक्यता असून करमाळा तालुक्यातच असे डिपी उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. बसवलेले डिपी ठेकेदारांने कोणत्या कंपनीकडून खरेदी केले आहेत, कोणाच्या परवानगीने खरेदी केले आहेत याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *