July 6, 2026
IMG-20260706-WA0021

करमाळा_चौफेर (पुणे प्रतिनिधी )

नारायण सेवा संस्थान, Neuman & Esser Engineering (India) Pvt. Ltd. आणि Tata Tele Business Services यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आज जपानी व जर्मन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 3D-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

या सेवाभावी उपक्रमात शिवसेना उपनेते डाॅ . रघुनाथ कुचीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे व परिसरातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी या शिबिरात सहभाग घेतला.

शिबिरात अनुभवी डॉक्टर आणि तांत्रिक तज्ज्ञांनी प्रत्येक लाभार्थ्याची सखोल तपासणी केली. त्यांच्या गरजेनुसार 3D-प्रिंटेड कृत्रिम अवयव आणि कॅलिपर्स तयार करण्यासाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले. जपान आणि जर्मनीच्या तंत्रज्ञानावर आधारित हे मॉड्युलर अवयव हलके, टिकाऊ आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहेत.या प्रसंगी बोलताना डाॅ . रघुनाथ कुचीक म्हणाले, “कृत्रीम अवयव म्हणजे केवळ शरीराचा आधार नसून दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आयुष्याचा मार्ग आहे. विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी होणे हीच खरी प्रगती आहे.”

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी नारायण सेवा संस्थान गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या उपक्रमाला Neuman & Esser Engineering आणि Tata Tele Business Services यांचे सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, डॉक्टर, स्वयंसेवकांचे डाॅ कुचीक यांनी अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांमधून अधिकाधिक दिव्यांगांच्या जीवनात बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *