July 6, 2026
IMG-20260706-WA0003

करमाळा_चौफेर  (भैय्याराज गोसावी वाढदिवस विशेष)

माणसाच्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या ध्येय, कार्य आणि विचार या त्रिसूत्रीला आधार मानून समाजकारण आणि जनहितासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे भैय्याराज गोसावी

“लोकहित हेच माझं राजकारण” हा त्यांचा ठाम विश्वास असून, गरीब, शेतकरी, वंचित, विद्यार्थी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलणे हेच त्यांचे ध्येय आहे.१. ध्येयवादी भूमिका

भैय्याराज गोसावी यांचे जीवन नेहमीच स्पष्ट ध्येयाशी जोडले राहिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, हेच त्यांनी आयुष्याचे ब्रीद मानले आहे.

२. प्रामाणिक कार्याचा पाया

सामाजिक कामात स्वार्थ न बाळगता प्रामाणिकपणे कार्य करणे ही त्यांची खरी ताकद आहे. अडचणीत असलेल्यांना तातडीने मदत , शिक्षण क्षेत्रात योगदान ,शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका या कामांमुळे ” भैय्याराज गोसावी” हे नाव समाजाच्या मनात ठसले आहे.

३. सकारात्मक विचारांचा दृष्टिकोन
“विचारच कृती घडवतात आणि कृतीतूनच माणूस उभा राहतो” या तत्वावर ते चालतात. लोकांशी मनमोकळा संवाद, समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती आणि सकारात्मक विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात समाजकारण आणि राजकारण वेगळ्या वाटेने जाताना दिसते. मात्र भैय्याराज गोसावी यांनी या दोन्हींना जनहिताची दिशा दिली आहे. जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर तोडगा काढणे यासाठी ते थेट लोकांशी संपर्कात राहतात.शेतकरी विद्यार्थ्यी यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात सामाजिक सलोखा आणि ऐक्य जपणे तरुणांना संघटित करून समाजकार्यात सहभागी करणे हि कामे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. भैय्याराज यांची वाटचाल समाजाला नवी ऊर्जा देत आहे.

ध्येय स्वच्छ, कार्य प्रामाणिक आणि विचार सकारात्मक असतील तर माणूस लोकांच्या मनात घर करतो.भैय्याराज गोसावी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे समाजकारण, राजकारण आणि जनहिताच्या त्रिवेणी संगमामुळे त्यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.७ जुलै रोजी भैय्याराज गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त सा.चौफेर च्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *