August 1, 2026
IMG-20260801-WA0027

करमाळा_चौफेर शंभू फरतडे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामुळे समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांचे वास्तव जीवन जगासमोर आले. अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लाख मोलाचे योगदान आहे. अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन हे एक यज्ञकुंडच होते, असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त वांगी नंबर 4 येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव बंडगर बोलत होते.

पुढे बोलताना प्रा. बंडगर म्हणाले की, कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे आदींच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी लोकपरिवर्तनाचे महान कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून लोकजागृतीचे काम केले. त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक जगतात मोठे परिवर्तन घडून आणलेया अभिवादन कार्यक्रमाला आदिनाथ कारखान्याचे संचालक दत्तात्रय देशमुख, वांगी जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर गोडसे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, वांगी नं. 4 चे सरपंच रामभाऊ सुळ, उपसरपंच भाऊसाहेब शेळके, युवा कार्यकर्ते उदयसिंह देशमुख, राज शेटे देशमुख, प्रमोद शेळके, सोमनाथ ढावरे, कुमार ढावरे, सौदागर नलवडे, सुग्रीव नलवडे आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्जुन तकीक यांनी केले, तर आभार वांगीचे माजी सरपंच संजय कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *