August 8, 2026
IMG-20260808-WA0043

                करमाळा_चौफेर लिंगेश्वर गोमे

उजनी काठच्या शेतकऱ्यांना वीजेसाठीचा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही.आठ तास वीज पुन्हा सात केली त्यात देखील लोडशेडिंग चे नाव पुढे करून एका पाळीत वीज पुरवठा करण्याचे टाईमींग चुकीचे टाकून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.संध्याकाळी दहा ते पहाटे पाच पर्यंत टाईमींग केल्याने शेतकऱ्यांना पाणी भरणे ,गुरांना पाणी पाजणे या साठी रात्री दहा पर्यंत विनाकारण ताटकळ बसावे लागत आहे.१०ते ४ ऐवजी ८ ते पहाटे ३ पर्यंत चे टाईमींग करावे जेणेकरून पाणी भरणे, गुरांना पाणी भरणे सोपे जाईल तसेच आठ वाजल्यापासून दहा पर्यंत शेतीला पाणी देण्याचे नियोजन करता येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .शेतकऱ्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना या बाबत विनंती केली आहे मात्र वरून हेच टाईमींग असल्याचे कारण सांगतीले जात आहे. आजी माजी लोकप्रतिनिधींकडून महावितरण ला सुचना झाल्यातर टाईमींग चेंज होवू शकते असे अधिकारी खासगीत बोलत आहेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करत आहे अशा टिमक्या सरकार वाजवते मात्र करमाळा महावितरण सरकारची अब्रू वेशीला टांगत आहे.महावितरण च्या आडमूठ धोरणाविरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *