करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
करमाळा तालुक्यातील युवकांना पोलीस व इतर शासकीय भरतीसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या “कमलाई करिअर अकॅडमी” चे आज दिमाखदार उद्घाटन झाले. अकॅडमीचे संस्थापक/संचालक किरण मांगले यांचे ११ वर्षांचे स्वप्न आज साकार झाले. या अकॅडमीचे उद्घाटन ह.भ.प. आनंद महाराज घारगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना ह.भ.प. आनंद महाराज घारगावकर म्हणाले, “सातत्यपूर्ण संघर्ष केला तर यश हमखास मिळते. युवकांनी संघर्ष व कष्ट करण्यापासून पळवाट शोधू नये. प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश तुमच्या पायावर लोळण घेईल.” असा सल्ला विद्यार्थांना दिला.
●११ वर्षांचा संघर्ष उलगडताना किरण मांगले भावूक●
अकॅडमीचे संस्थापक/संचालक किरण मांगले यांनी अकॅडमी उभारणीचा इतिहास सांगताना सर्वांना भावूक केले. ते म्हणाले, “गेल्या ११ वर्षांपासून दुसऱ्या ठिकाणी शिकवणीचे काम केले. इतरही कामे केली. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्वतःची अकॅडमी उभारू शकलो नव्हतो. आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे स्वप्न साकार झाले आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.”
पुढे बोलताना मांगले यांनी या अकॅडमीमधून परिपूर्ण मार्गदर्शन करून जास्तीत जास्त युवकांना पोलीस खात्यात भरती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.या प्रसंगी प्रा.दत्तात्रय मांगले ,गोरे गुरूजी, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, छत्रपती शासन चे प्राणजीत गवंडी, प्रहारचे परांडा तालुकाप्रमुख आप्पा तरटे, शिवसेनेचे हरी डिकोळे, विकास गिरवले सर यांनी मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन सोहळ्याला भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे – माजी पंचायत समिती सदस्य पै. जयराम “तात्या” सोरटे, भाजप शहर प्रमुख जगदीश आगरवाल, युवासेना जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, आप्पा तरटे, हरी डिकोळे, ऋषीकेश फंड, गोरे गुरुजी, प्रभाकर दौंडे, राम शिकारे, अजिनाथ कदम, रमेश मगर, राहुल जाधव, विकास गिरवले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री पाचपिले सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद मांगले सर यांनी मानले .मान्यवरांचे स्वागत गोरे गुरूजी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर चव्हाण सर, रेवन भोसले सर, अक्षय शिंदे सर यांनी परिश्रम घेतले
