August 2, 2026
IMG-20260802-WA0021

करमाळा_चौफेर  दिग्वीजय बागल यांचा ‘ मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा सह अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अन् भाजपाच्या सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदी जि . प . सदस्य गणेश चिवटे यांची निवड झाल्याबद्दल मा . आ . जयवंतराव जगताप यांच्या हस्ते झाला सन्मान ●” जो दौडेगा वो मंजील पाएगा”● 

आजचा काळ बदलला आहे . जो सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाईल , अडी -अडचणी सोडवील त्याला नेता म्हणून जनता स्विकारते , वारस्याने जनमानसांत जाण्यापेक्षा संघर्षातून , कष्टातून व स्वकर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करावं , बुजुर्ग मंडळीचं अवश्य मार्गदर्शन घ्यावं , वेळ कुणासाठी थांबत नाही , कष्टाच्या बळावर ध्येय गाठून मिळालेल्या संधीतून जनता जनार्दनाची सेवा करावी , सध्या युवंकाकडून राष्ट्र व समाज हिताच्या अपेक्षा आहेत .बुजुर्ग मंडळीनीही कर्तृत्ववान युवकांच्या पाठीशी राहून वडीलकीच्या नात्यानं मार्गदर्शन करावं असे प्रतिपादन जगताप कुटूंबाच्या वतीने आयोजीत दिग्वीजय बागल व गणेश चिवटे यांच्या घरगूती सत्कार समारंभात मा . आ . जयवंतराव जगताप यांनी मार्गदर्शन करताना केले . नुकतेच दिग्वीजय बागल यांची ‘ मुख्यमंत्री बळीराजा पाणंद /शेत रस्ता ‘ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या राज्याच्या महसूल मंत्र्याच्या मार्गदर्शनाखालील समिती मध्ये करमाळा विधानसभा सह अध्यक्ष पदी निवड झाली आहे तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहीलेले विद्यमान जि. प . सदस्य गणेश चिवटे यांची पक्ष बळकटी साठी सोलापूर पश्चिम भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन्ही सुपुत्रांचा वडीलकीच्या नात्यातून मा . आ . जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप परीवाराच्या वतीने घरगूती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी अधिक बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देशभक्त कै . नामदेवराव जगताप ,स्व . आण्णासाहेब जगताप यांच्या कार्याचा आढावा घेत माजी राज्यमंत्री स्व. दिगंबर बागल मामा यांच्या बरोबरच्या दोस्तान्याला उजाळा दिला . १९८९ पासून च्या राजकिय व सामाजिक वाटचालीतील काही प्रसंग सांगून आठवणींना उजाळा देवून दोन्ही सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती , जेष्ठ समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर , माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , गटसचिव नेते बबन मेहेर , बाजार समिती संचालक जनार्दन नलवडे , बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर , उद्योजक संतोषशेठ गुगळे , माजी नगरसेवक सुरेश इंदूरे , भाजपाचे जगदीश आगरवाल , सुहास घोलप , संजय घोरपडे , बाजार समिती संचालक मनोज पितळे , विक्रांत मंडलेचा , कॉन्ट्रॅक्टर भारत थिटे , अनिल सुरवसे , दत्तात्रय शिर्के , नितीन दळवे , लक्ष्मण थोरात , जोतीराम ढाणे , नगरसेवक युवराज चिवटे , नगरसेवक रोहीदास आलाट , नगरसेवक सचिन अब्दूले , विजय सरडे , प्राचार्य डॉ . तानाजी जाधव , मुख्याध्यापक अनिस बागवान, मुख्याध्यापक युसूफ शेख , बाजार समिती सहसचिव रवींद्र उकीरडे ,शेखर जोगळेकर , मंगेश तरकसे , महेश ढाणे , दिगंबर रासकर , खरेदी विक्री संघ संचालक हनुमंत ढेरे , शहाजी शिंगटे,बाजार समितीचे नूतन संचालक हनुमंत चांदणे ,मयूर दोशी , उत्कर्ष गांधी , श्री . सुनील मेहता , अमृतशेठ कटारिया , अस्लम शेख, सादीक आतार , रविंद्र सपकाळ , चेतन आलाट आदीं उपस्थित होते . यावेळी प्रा . दत्तात्रय भागडे यांनी प्रास्तविक करून स्वागत केले . यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ , श्रेणीक शेठ खाटेर , संजय घोरपडे , बबन मेहेर यांनी मनोगते व्यक्त केली . सत्कार मूर्ती दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांनी मनोगते व्यक्त करून केलेल्या यथोचित सन्मानाबद्दल ऋण व्यक्त केले . .या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ . तानाजी जाधव यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *