July 30, 2026
IMG-20260730-WA0069

करमाळा_चौफेर

‘सैराट’ फेम अभिनेता सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील असलम रसूल शेख वय 60 यांचे आज गुरुवारी सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

असलम शेख यांना 29 जून रोजी अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यांना प्रथम करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.याच काळात त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी “औषध व गोळ्या आमच्याच फार्मसी दुकानातून घ्याव्या लागतील, अन्यथा पेशंटला घेऊन जा” अशी सक्ती केल्याचा आरोप झाला. सैराट फेम कलाकार असला तरी अरबाज शेखची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने नैराश्यातून या हॉस्पिटलची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. “हॉस्पिटल रुग्णांकडून त्यांच्याच औषधी दुकानातून औषध घेण्याची सक्ती करत आहे” अशी पोलखोल केल्याने राज्यभर खळबळ माजली होती.हा प्रकार समजताच शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी अरबाज शेख यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत अरबाज शेख यांना उपचारासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.त्यानंतर असलम शेख यांना सोलापूरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून त्यांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला.मात्र उपचार सुरू असतानाच आज दुपारी असलम रसूल शेख यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *