करमाळा तालुक्याच्या जडणघडणीत ज्यांचे नाव आदराने, अभिमानाने घेतले जाते, ते म्हणजे करमाळ्याचे लाडके नेतृत्व माजी आमदार संजयमामा शिंदे. सत्तेत असो वा नसो, “करमाळा फर्स्ट” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारे मामांचे कार्य नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी ठरले आहे.
●विकासाची दुरदृष्टी – कामातून दिसणारा नेता●
मामांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे निश्चितच प्रेरणादायी असून, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया रचणारी ठरली आहेत. दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून उजनी-सीना जोड कालव्यासाठी केलेला पाठपुरावा आजही शेतकऱ्यांच्या लक्षात आहे.दहीगाव उपसा सिंचन योजनेस सुप्रमा मंजुरी मिळवून दिली. कुकडीची नियमित आवर्तने सुरू करून पश्चिम भागातील शेतात पाणी पोहोचवले.रिटेवाडी उपसा सिंचनाचा पाठपुरावा करून कुकडी प्रकल्पातील पाणी उजनीमध्ये आणत उजनी-कुकडी उपसा सिंचन योजनेच अभ्यासपूर्ण नियोजन केले.
●पूल व दळणवळण – दुरावलेली गावे जोडली●
उजनीवरील शिरसोडी ते कुगाव पूल, चांडगाव ते पोमलवाडी पूल आणि पश्चिम भागाची वरदायिनी ठरलेला डिकसळ ते कोंढारचिंचोली पूल यासाठी केलेला पाठपुरावा व निधी मंजुरी ऐतिहासिक ठरली.राशीन बॉर्डर ते वेणेगाव 72 किमी चा राज्यमार्गासह तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत केले.टेंभुर्णी ते जातेगाव मार्गासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण एनओसी मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय.
●प्रशासकीय व पायाभूत सुविधा●
करमाळा तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांच्या सुसज्ज इमारतींसाठी भरीव निधी मिळवला.तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयांच्या नवीन इमारती उभारल्या, त्यामुळे सामान्य जनतेची कामे जलद होऊ लागली. MIDC करमाळा चा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
●आरोग्य व वीज – मूलभूत गरजा भागवल्या●
सिव्हील हॉस्पिटल करमाळा सह जेऊर व अन्य ठिकाणी सुसज्ज आरोग्य मंदिरे व यंत्रणा उभारल्या.कोळगाव, राजुरी, आवाटी, रावगाव सह नवीन विद्युत वितरण उपकेंद्रे सुरू करून वीजटंचाईचा प्रश्न सोडवला.
●धार्मिक व सामाजिक बांधिलकी●
श्री कमलादेवी मंदिर व चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थाना साठी मंजूर केलेला निधी हा सांस्कृतिक वारसा जपण्याचे उदाहरण आहे. कोव्हीड काळ, दुष्काळ व पूर परिस्थितीत केलेली भरीव मदत मामांच्या संवेदनशील नेतृत्वाची साक्ष देते. करमाळा तालुका व कुर्डुवाडीसह 36 गावांत केलेली विकासकामे म्हणजे संजयमामांच्या दुरदृष्टी नेतृत्वाची खरी झलक आहे.
● कार्यकर्त्यांचा आधारवड – “गॉडफादर ऑफ करमाळा●संजयमामा हे फक्त नेते नाहीत, तर सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि प्रत्येक जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे. मामा फक्त नेते नाहीत, ते कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आहेत. रात्री-अपरात्री कार्यकर्त्याचा फोन उचलणारे, अडचणीत स्वतः हजर राहणारे, आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारे नेतृत्व म्हणजे संजयमामा. त्यांच्या कार्यालयाचे दार कायम उघडे. “मामा आहेत ना” हा शब्दच करमाळ्यातील हजारो कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देतो.
●एक कार्यकर्त्याची भावना●
“माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समिती केत्तुर गणातून उमेदवारी देऊन आणि नंतर करमाळा तालुक्याच्या उपसभापती पदावर निवडून संधी देणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण टप्पे आहेत. हे केवळ पद नाही, तर मामांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. मी सन 2022साली आदरणीय संजयमामा शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशाच्या वेळी मी व्यक्त केलेली भावना आजही माझ्या कानात घुमते –
‘संजयमामा, यापुढे तुम्ही माझे गॉड फादर व्हावे’आणि मामांनी ती भावना सत्यात उतरवली. मला व माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी जे बळ दिले, जी ताकद दिली, ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. संकटात पाठराखण करणारे, संधी देऊन मोठे करणारे, आणि कार्यकर्त्याचा स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणजे संजयमामा. कार्यकर्त्यांना बळ देणारे संजयमामांचे नेतृत्व माझ्यासाठी दैवतासमान आहे.”
●करमाळ्याचा स्वाभिमान●
विरोधकांनी कितीही टीका केली तरी “करमाळा फर्स्ट” हेच त्यांचे धोरण राहिले. सत्तेत असो वा नसो, मामांनी कधी करमाळ्याशी प्रतारणा केली नाही. आज नव्या पिढीला राजकारणात यायचे असेल तर संजयमामा शिंदे यांचा “लोकसेवेचा, विकासाचा आणि निष्ठेचा” वारसा प्रेरणा देतो.
मामा, तुम्ही दिलेला विश्वास आणि संधी आयुष्यभर विसरणार नाही. तुमच्या नेतृत्वाखाली करमाळ्याच्या विकासासाठी लढत राहीन!
●पोमलवाडी चांडगाव पुल●
पोमलवाडी ते चांडगाव पुलाचे संदर्भात मी आदरणीय संजयमामांना भेटलो.. सर्व माहिती दिली.. मामांनी हे काम आपण नेते उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून सांगु आणि करून घेऊ असे सांगितले. एका नियोजित दौऱ्याचे वेळी स्व. अजितदादा पवार साहेब नगोर्लीच्या मामांच्या फार्म हाऊसला येणार होते. मला आठवणीने मामांनी संदर्भीत फाइल घेऊन बोलावले आणि आदरणीय नेते अजितदादां बरोबर सकारात्मक चर्चा घडवुन आणली.दादांनी शब्द दिला हे काम शंभर टक्के करू. मामांनी व दादांनी दिलेला शब्द सार्थ झाला. सततचा केलेला योग्य पाठपुरावा आणि मान.अजितदादांनी दिलेले बळ, मंत्री दत्तामामा भरणे यांनी केलेले सहकार्य यामुळे या कामासाठी तब्बल ३४० कोटींची मंजुरी मिळाली. लवकरच हे काम चालु होत आहे.
विकासाची दूरदृष्टी असलेल्या या कर्तबगार नेतृत्वास आई कमलाभवानी व श्री किर्तेश्वर महाराज उदंड आयुष्य देवो व पुन्हा एका मामा करमाळयाचे आमदार म्हणून मंत्रीमंडळात दिसावे हिच मनोककामना व्यक्त करतो. ( ✍🏻ॲड.अजित सर्जेराव विघ्ने.उपसभापती पंचायत समिती करमाळा)

