May 29, 2026
IMG-20260528-WA0013

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)

करमाळा तालुक्यातील साडे-सालसे-जेऊर या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून. ‘करमाळा चौफेर’ने या रस्त्याची दुरवस्था समोर आणून नागरिकांचा दबलेला आवाज प्रशासना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.रस्त्यावरून  प्रवास करताना दुचाकी-चारचाकींचे दर महिन्याला हजारोंचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.खड्डे चुकवताना  आतापर्यंत किरोकोळ अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाही. गाडीचे हप्ते फेडायचे की गाडी दुरुस्त करायची?” असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत.दरवर्षी  या रस्त्याची मलमपट्टी  करण्यावर प्रशासनाकडून लाखो रूपयांचा चुराडा केला जात आहे.हा निधी रस्ता दुरुस्त करण्यासाठी असतो ,का अधिकारी व ठेकेदार यांची घरं भरण्यासाठी असतो ?असा संशय नागरीक व्यक्त करू लागले आहेत. साडे, सालसे, जेऊर परिसरातील शेतकरी, व्यापारी व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जेऊर हे तालुक्यातील मोठे बाजारपेठेचे गाव आहे तसेच रेल्वे स्टेशन असून. रेल्वेने सोलापूर, पुणे ,मुंबई जाण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावरून पुर्व भागातील शेकडो नागरिकांची दररोज ये-जा असते.,छोट्या कार गाड्या, दुचाकी, तीन चाकी टमटम यांना तर या रस्त्यावरून प्रवास करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधी गप्प का?●

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण पहिल्याच पावसात रस्ता पुन्हा ‘जैसे थे’ होतो. डांबर टाकून बुजवलेले खड्डे दोन दिवसांत पुन्हा आहे तसेच होतात. हा निधी कोणाच्या घशात जातो.या गंभीर बाबींकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष का केले जाते ? असा सवाल उपस्थित होत आहे.

“सालसे साडे रस्त्याचे खड्डे बुजविण्यात येणार आहेत या साठी निधी मंजूर आहे.तसेच रस्त्यांच्या दुरस्ती साठी प्रस्ताव सादर केला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर या रस्त्याची प्राधान्याने दुरस्ती करून घेणार आहोत;.  -अभिषेक पवार- (उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कारमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *