करमाळा_चौफेर
करमाळा आगाराला नवीन बसेस मिळाल्या असल्या तरी बसेस बंद पडणे आणि वेळापत्रक ढासळण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचा फटका शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसत असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज सकाळी गौंडरे-अंजठानगर बस गियर बॉक्स फेल झाल्याने अर्जुननगर रस्त्यावर बंद पडली. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.एकीकडे बसेस बंद पडत आहेत तर दुसरीकडे करमाळा आगारातील बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक मुक्कामी आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस उशिरा फलाटावर लागत आहेत याचा देखील विद्यार्थांना फटका बसत आहे
पूर्वभागातील हिवरे, हिसरे, कोळगाव येथील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी करमाळा येथील महात्मा गांधी हायस्कूल, अण्णासाहेब जगताप हायस्कूल आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. 4 वाजता शाळा-कॉलेज सुटल्यानंतर हे विद्यार्थी गौंडरे मार्गे बार्शी जाणाऱ्या एसटीने स्टँडवर येतात. परंतु पूर्वी साडेचारला सुटणारी गौंडरे मार्गे बार्शी बस आता दररोज सहा ते सात वाजता लागते.
दिनांक 13 जुलै रोजी बार्शीची गाडी चक्क रात्री 8 वाजता फलाटावर लागली आणि साडेआठला हिवरे येथे पोहोचली. अंधार झाल्याने आणि रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने बसमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी गावापासून 500 मीटर पुढे असलेल्या मंदिराजवळ तिचे घर असल्याने व त्याच रोडने बस जात असल्याने घराजवळ सोडण्याची विनंती चालक-वाहकाला केली. परंतु चालक-वाहकांनी कोणतीही दयामया न दाखवता तिथे बस थांबविता येणार नसल्याचे कारण सांगून गावातीलच स्टॉपवर सोडले. पुढे स्मशानभूमीजवळून पळत जाऊन मुलीने घर गाठले. या घटनेनंतर 2 दिवस झाले तरी मुलगी भीतीने रात्री घाबरून उठत आहे.
विशेष म्हणजे हिवरे स्टॉप पासून मंदिराचे अंतर स्टेज च्या आत असताना आणि आगारच्या निष्काळजीपणामुळे उशीर होऊनही मंदिराजवळ सोडण्यास नकार देणाऱ्या चालक-वाहकावर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि नागरिक करत आहेत.
●युवासेनेचा ठिय्या आंदोलनाचा इशारा●
गेल्या अनेक दिवसांपासून करमाळा आगारातील बसेस रस्त्यावर बंद पडत आहेत, नवीन बसेस आल्यानंतर देखील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जुण्याच बसेस धावत आहेत, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसेस चे वेळापत्रक कोलमडले आहे.अनेक वेळा विद्यार्थ्यांनी कंट्रोल रूमला याबाबत तक्रार करून देखील बसेस चा वेळेत सुधारणा होत नाही.आठ वाजेपर्यंत आठवी दहावीतील मुल मुली बसस्थानकावर थांबून रहातात गैरप्रकार घडला तर जबाबदार कोण? असा सवाल युवासेनेकडुन विचारला असून उद्या ११ वा.आगार प्रमुख यांच्या दालनात विद्यार्थांसह ठिय्या आंदोलन करणार आहे–शंभूराजे फरतडे (युवासेना तालुकाप्रमुख)
विद्यालय देखील जबाबदार!
पुर्वभागातील हिसरे व गौंडरे मिळून तिन विद्यालय आहेत मात्र करमाळ्यातील हायस्कूल ला विद्यार्थी मिळवण्यासाठी करमाळ्यातील शिक्षक प्रयत्न करतात सेमी,गुणवत्ता या विषयावर पालकांना करमाळ्यातील हायस्कूल ला विद्यार्थी पाठवण्या बाबत राजी करतात मात्र हायस्कूल सुटल्यानंतर विद्यार्थी स्टॅण्डवर पोहचले का?त्यांना वेळेवर बस मिळते का? या गंभीर बाबीकडे या विद्यालयाचे कोणतेच लक्ष नसल्याचे समोर दिसत आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बेफिकीर वागणार्या या विद्यालयात आपल्या मुलींना पाठवावं का? याचासुद्दा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. 
