रश्मीदिदी बागल वाढदिवस विशेष- (करमाळा_चौफेर)
आज करमाळा तालुक्यात असो, सोलापूर जिल्ह्यात असो वा महाराष्ट्र राज्यात. तसेच महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातही आपल्या कर्तृत्वाने, जबाबदारीच्या कामाने सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय लोकनेते, गोरगरीबांचे कैवारी, धाडसी असे माजी न्यायमंत्री दिगंबररावजी बागल यांची कन्या. सोलापूर जिल्हा परिषद सदस्या, गटनेत्या, करमाळा तालुक्याच्या विकासासाठी बुलंद आवाज, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, अत्यंत हुशार, शिस्तप्रिय, सामान्य जनतेचा आवाज, आधार आदरणीय रश्मी (दिदीसाहेब) बागल यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप.. खूप.. शुभेच्छा !
आदरणीय डिगामामा असताना राजकारणाचा वासही नसताना डिगामामा नंतर त्यांचा राजकीय वारसा अत्यंत काटेकोरपणे व शिस्तबद्ध पद्धतीने माणुसकीने चालवणाऱ्या या वाघीणीचे करावे तेवढे कौतुक कमीच. राजकारणात विविध पदे भुषवून अत्यंत निष्ठेने पार पाडलेली कामे असतील किंवा समाजकारणातून सर्वसामान्यांचे कामे असतील हे दिदी साहेबांनी खूप मनापासून आणि संघर्षातून आपलीशी केली आहेत. स्वतःला वडिला नंतर राजकारणासाठी किंवा समाजकारणासाठी तयार करण्यापासून ते राजकारणात उतरण्यापर्यंतचा प्रवास जरी कितीही खडतर असला तरीही दिदीसाहेबांनी कधी हार मानली नाही. उलट संघर्षातून त्या नव्याने निर्माण झाल्या. संघर्ष कन्या या नावाची उपाधी त्यांना अनेक समर्थकांनी कार्यकर्त्यांनी दिली आहे. दिलेल्या उपाधी प्रमाणेच त्यांचे व्यक्तीमत्वही आहे.
आजच्या युगात आधुनिकतेने जग जरी प्रगतीपथावर चालले असलेतरीही काही महिलांना स्वतःवर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होत नाही म्हणजे भिती असेल किंवा आत्मविश्वासाचा अभाव असेल. अशा महिलांना दिदीसाहेबांमुळे पुढे जाण्याचे, समाजाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी दोन हात करण्याची ताकद मिळाली आहे. त्यांचं व्यक्तीमत्व पाहून अनेक महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला व त्या आज कितीतरी क्षेत्रात कार्यरत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक महिलांना दिदीसाहेबांमुळे एक आत्मविश्वासाची उभारी आली आहे. महिलांसंबंधी काही अडचणी असो वा महिलांच्या हक्कासाठी अडचणी असो.. दिदीसाहेब खूप अभ्यासपूर्वक सोडवतात.
अभ्यासू, उच्चशिक्षित, शिस्तबद्ध, कामातील काटेकोरपणा, जिद्द, चिकाटी हे गुण दिदीसाहेबांना अनेकांपासून एक सकारात्मक अशी नवीन ओळख करून देतात. नाती, बंध फक्त कामापुरतेच नसतात, ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतून, वर्तनातून नेहमी स्पष्ट होते. ज्या कामाविषयी चर्चा असते नेमकं त्याच विषयावर चर्चा करणे, त्या विषयीचा तोडगा काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे हे दिदीसाहेबांचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.
सुशिक्षित, सुसंस्कृत, माणुसकीच डिगामामाचा परिवार, बागल घराणं दारात मदतीसाठी आलेला व्यक्ती त्यांच्या अडीअडचणीच्या निवारण्यासाठी नेहमी सज्ज असतं. माजी आमदार शामलताई (मामीसाहेब) दिगंबरराव बागल असतील, जिल्हा नियोजन समिती सदस्य व डिगामामांचा ढाण्या वाघ म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे करमाळा तालुक्याचे युवा नेते आदरणीय दिग्विजय (प्रिन्स) दिगंबररावजी बागल असतील, रणरागिणी संघर्ष कन्या दिदीसाहेब असतील. दारात आलेला व्यक्ती त्यांची अडचण यांच्यापैकी कोणाच्याही कानावर आली किंवा कोणाकडेही आली की ते काम मार्गी लागतच.
बागल कुटुंबासोबत कोलते कुटुंब या रक्ताच्या नात्यापासून ते राजकारणातील सर्व नात्यांना आपलं माननं, त्यांच्या सुख-दुःखात सामील होणं, त्यांना आधार देणं हे दिदींना खूप चांगल्याप्रकारे जमतं. त्यांच्या जवळ काम घेवून येणारी व्यक्ती सर्वसामान्य असो वा गरजू असो, अडीअडचणीत सापडलेली असो.. त्यांना त्या नेहमी धीर देतात. एखाद्याला नव्याने आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने कसं उभं करावं हे दिदींना त्यांच्या असलेल्या अभ्यासूवृत्तीने आणि अनुभवाने जमतं. सुखात असेलच असं नाही पण दुःखात मी नेहमी सोबत असेल.. असं म्हणणाऱ्या दिदीसाहेब खरंच खूप ग्रेट व्यक्तीमत्व आहे.
“स्वतःचं आयुष्य सावरायच्या वयात कुटुंबाचं नेतृत्व करावं लागलं…, वडिलांच्या नावाखातर सगळं दुःख विसरून कुटुंबाला स्वतःच्या पंखाली घ्यावं लागलं…, वडिलांचा संघर्ष मनात ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागलं…, खचून, हार मानून जमत नव्हतं म्हणून येईल त्या संकटाला तोंड द्यावं लागलं…!”
“संघर्ष कन्या ती डिगामामाची…, डिगामामाचे विचार पुन्हा नव्याने अंगी रुजवावं लागलं…, विचार रुजवताना खूप काही अनुभवावं लागलं…, पण हार मानेल ती डिगामामांची वाघीण रणरागिणी कसली…, शेवटी नियतीलाही विजयी रूपी फळ पदरात टाकावचं लागलं..!” ✍🏻
सौ.रेणुकाताई मोहोळकर मोरवड, ता.करमाळा.

