करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍🏻)
करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले व एकनाथ शिंदे यांचे अंत्यत विश्वासू महेश चिवटे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर नगरपालिका निवडणुकीतील पराभवा नंतर शिंदेसेने पासून फारकत घेतलेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे पुन्हा शिंदेसेनेत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे
उद्योग मंत्री उदय सामंत माढा तालुक्याच्या दौर्यावर आले असता माजी आमदार जयवंतराव जगताप व युवानेते शंभूराजे जगताप यांनी अनेक वाहनांचा ताफा घेऊन उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळे शंभूराजे जगताप यांनी औद्योगिक वसाहत व कृषी पुरक उद्योगां संदर्भातील अडचणीं व विविध सूचनांचे निवेदन सामंत यांनी दिले.उद्योग मंत्र्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
या घडामोडीत ज्या चिवटे बंधूनी जगताप यांना मुंबई ला घेऊन जावून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पाडला त्या चिवटेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली तसेच गाड्यांवर लावलेल्या पोस्टर वरून देखील चिवटेंचा फोटो गायब होता. या पोस्टरवर स्व बाळासाहेब ठाकरे, स्व आंनद दिघे स्व नामदेवराव जगताप यांचे वरती फोटो असून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे,मंत्री उदय सामंत , खासदार धैर्यशील माने, माजी आमदार शहाजी बापू पाटील, संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील ,यांचे फोटो आहेत तर युवानेते शंभूराजे व जयवंतराव जगताप यांचे दोन्ही बाजूस ठळक फोटो छापले आहेत.
नगरपालिका निवडणूक प्रचार दरम्यान जगताप यांनी चिवटे यांना प्रचारा पासून दुर ठेवले होते तेव्हा पासून चिवटे जगताप यांच्यावर नाराज होते.नगरपालिकेवर सावंत गटाचा विजय झाल्यानंतर सावंत गटाचे युवानेते सुनील सावंत व महेश चिवटे यांच्यातील कटुता कमी होवून जवळीक वाढली होती. सावंत गट शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या देखील चर्चा होत्या मात्र दरम्यान च्या काळात चिवटे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर चित्र पालटले असून शिंदेसेने पासून फारकत घेतलेले जगताप पिता पुत्र पुन्हा शिंदेसेनेत सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू आहेत.
नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष समित्या निवडणुकीत सावंत गट व बागल गट युती असली तरी जिल्हापरिषद निवडणुकीत सावंत विरूद्ध बागल लढत झाली व या वेळेस नगरपालिकेचा वचपा काढण्यासाठी जगताप यांनी बागल यांना पाठिंबा देऊन विजयी करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती.
सध्या बागल गट व जगताप गटांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले आहे.बागल हे भाजपात सक्रिय असून, जगताप यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय होवून सावंत व चिवटे यांची राजकीय गोची करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का? अशी चर्चा देखील सुरू आहे.
संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या बैठक झाल्यानंतर जयवंतराव जगताप यांनी शिंदेसेनेत सक्रिय होण्याची तयारी दर्शवली असून शंभूराजे जगताप यांना संघटनात्मक तसेच जिल्हा नियोजन, किंवा स्वीकृत जिल्हापरिषद सदस्य शब्द दिला असून करमाळा माढ्यासह पंढरपूर विभागाची सर्व जबाबदारी जयवंतराव जगताप यांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
बागल यांना शह देण्यासाठी चिवटे यांनी जगताप यांना जवळ केले होते ,व आता जगताप यांना शह देण्यासाठी सावंत यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र सध्या बागल -जगताप यांचे सुत जुळले आहे तर जगताप गट शिवसेनेत पुन्हा सक्रिय होत आहे त्यामुळे स्वाभिमानी व बंडखोर विचारसरणीचे महेश चिवटे यांची आगामी भुमिका व डावपेच काय असणार या कडे लक्ष लागले आहे.
चिवटे बंधू सध्या पक्षीय घडामोडी मध्ये बॅकफूटवर आहेत. महेश चिवटे यांना पदावरुन बडतर्फ करण्यासाठीच बॉडी बरखास्त केली होती अशी चर्चा शिंदेसेनेत आहे.मंगेश चिवटे हे जरी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असले तरी करमाळा तालुक्यातील पाटील, जगताप व बागल हे शिवसेनेत असताना या तीन्ही गटनेत्यांशी चांगले संबध ठेवण्या ऐवजी कुरघोडीचे राजकारण केल्याने याचा फटका पक्ष वाढीवर बसला व यामुळेच आज नवीन पदाधिकारी निवडण्याची वेळ शिवसेनेवर आली अशी देखील कुजबुज आहे.
सर्व घडामोडींनंतर देखील पक्ष ,चिवटे यांच्यावरच पुन्हा विश्वास ठेवणार ,का? नवीन चेहर्याना संधी देणार ,याची देखील उत्सुकाता आहे.
