करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
“विद्यमान आमदारांनी दोन वर्षात काय केले?” या संजयमामा समर्थक जि.प. सदस्या वनिता गुळवे यांच्या प्रश्नाला आमदार नारायण आबा पाटील यांनी ‘विकासकामांच्या आकडेवारीसह’ चोख उत्तर दिले आहे. “गेल्या दीड वर्षात ग्रामविकासावर भर देत 70 कोटींची कामे प्रस्तावित केली असून 15 कोटीची कामे मार्गी लागली” असा दावा पाटील यांनी केला. असून स्वतः आमदार नारायण आबा पाटील यांनी या बाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात आमदारपाटील यांनी म्हटले आहे की “आमदार स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करमाळा मतदारसंघातील 70 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली. यातील 15 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून कामे सुरू आहेत. उर्वरित 55 कोटींच्या कामांना इस्टिमेट प्राप्त होताच मंजुरी दिली जात आहे.” वाडी-वस्तीवरील रस्ते, सभामंडप, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, शाळा-अंगणवाडी दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा, वाचनालय, समाजमंदिर, भुयारी गटार, व्यायामशाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, हायमास्ट दिवे, संगणक संच अशा कामांसाठी निधी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
दहिगाव उपसा सिंचन 4 आवर्तने, कुकडी 4 आवर्तने, रावगाव 33/11 केव्हीए सबस्टेशन, शेटफळ-वांगी-मांगी येथे 5 एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, मांगी येथे 17 किमी फीडर लाईन, उपजिल्हा रुग्णालयासाठी 2 कोटी वाढीव निधी, जलयुक्त शिवार अंतर्गत बंधारे-ओढा खोलीकरण ही कामे पूर्ण झाल्याचा दावा आबांनी केला आहे.
“अतिवृष्टी व अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईपोटी 200 कोटी रुपये निधी मिळवून दिला. डिकसळ पुलाच्या बांधकामासंबंधी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मागणी करून मूळ आराखड्यात बदल करत मागील चार वर्षांपासून रखडलेल्या कामास गती दिली, करमाळा मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत 17 वेळा आवाज उठवला व शेकडो प्रश्न लेखी स्वरूपात मांडले असल्याचे सांगून दीड वर्षात सक्रिय राहून काम केल्याने जनतेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना सत्ता व जि.प. पं.स. निवडणुकीत यश मिळवून दिले आणि विकासकामांची पोचपावती मतपेटीतून दिली आहे,” असा टोलाही पाटील यांनी लगावला शिंदे गटाला लगावला आहे.
याशिवाय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस ‘वेबकॉस’ कडून हिरवा कंदील मिळवून घेत सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा केला असल्याचे तसेच उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर गाळपेर जमीनीवर पिके घेण्यास निर्बंध घालण्यात आले तेंव्हा आपण यावर स्थगिती आणुन धरणग्रस्तांच्या बाजूने उभा राहण्याचे काम केले असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगीतले
गेल्या दिड वर्षात ग्रामविकासावर भर दिला असून ७० कोटींची विकासकामे प्रस्तावित केली असून पंधरा कोटी रुपयांच्या कामाना प्रशासकीय मंजूरी मिळून सदर कामे मार्गी लागली आहेत अनेक मंजूर कामे पुर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर आमदारांच्या बरोबरीत करमाळा मतदार संघातही ग्रामविकासाची कामे चालू आहेत.
-आमदार नारायण (आबा) पाटील
