July 6, 2026
IMG-20260706-WA0069

करमाळा_चौफेर (केम प्रतिनिधी)                                  केम गावचे ग्रामदैवत असलेल्या  उत्तरेश्वर मंदिर परिसरात सध्या कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यात प्लास्टिक, कापड, पुठ्ठे आणि इतर कचऱ्याचा मोठा ढीग साचला असून पाणीही दूषित झाले आहे. या मुळे धार्मिक स्थळाच्या पवित्रतेला बाधा येत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते सागरराज तळेकर यांनी देवस्थान ट्रस्ट आणि केम ग्रामपंचायत यांना तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.ते म्हणाले, “ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर हे आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. अशा पवित्र ठिकाणी जर कचऱ्याचे ढीग असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढतो आहे.” या परिसरात हायस्कूल व महाविद्यालय असल्याने अनेक विद्यार्थ्यांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते त्यांच्या आरोग्यावर देखील परिमाण होत आहे.तसेच याच मैदानावर आठवडी बाजार भरला जातो या दुर्गंधी वरील माशा बाजारातील भाजीपाला,तसेच मिठाई वर बसतात मात्र या गंभीर बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, या परिसरात कचरा टाकण्यासाठी मोठ्या डस्टबीन उपलब्ध करून नियमित सफाईची व्यवस्था करावी नागरिकांमध्ये जनजागृती करून मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आवाहन करावेकेमकरांची श्रद्धा असलेल्या या मंदिर परिसरात लवकरात लवकर स्वच्छता व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांमधूनही होत आहे. या उपर देखील ग्रामपंचायत ट्रस्ट यांनी कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा तळेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *