करमाळा चौफेर
दि. 20 मे रोजी करमाळा बसस्थानकावरून एका महिलेचे 5 तोळे सोने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांचा माग काढणे पोलिसांना कठीण झाले .या गंभीर प्रकारानंतर पत्रकार व ठाकरे पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी तात्काळ करमाळा आगार प्रमुखांची भेट घेतली. “बसस्थानकातील सर्व CCTV तात्काळ सुरू करा, प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ खपवून घेतला जाणार नाही” , असा इशारा त्यांनी दिला.
करमाळा शहरातील प्रमुख चौकांमध्येही उच्च प्रतीचे सिसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. याची तात्काळ पूर्तता करावी शहरातील व बस स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही पोलीस स्टेशन ला जोडले जावेत अशी महत्वपूर्ण मागणी फरतडे यांनी केली असुन संपूर्ण शहर CCTV च्या जाळ्यात आणल्याशिवाय चोरीची प्रकरण आटोक्यात येणार नाही” , असे ते म्हणाले.
नुतन आगार प्रमुखांन कानडे साहेब यांनी CCTV रिपेअर करणारे व स्पेअर वेळेत उपलब्ध होत नसल्याने विलंब लागला असून दोन दिवसांत सर्व कॅमेरे सुरू करू असे आश्वासन दिले आहे.
●CCTV भेट देऊन देखील बंद आहेत हे दुर्दैव!●
“मनसे तालुकाप्रमुख संजय घोलप यांनी अनेक वर्षांपासून शहरात CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.यास मंजुरी देखील मिळाली आहे.तसेच त्यांनी स्वखर्चातुन करमाळा बसस्थानकाला CCTV कॅमेरे भेट दिले होते. शहरात कॅमेरे बसवण्यास होत असलेला विलंब व बसस्थानकावरील बंद असलेले CCTV याबाबत मनसे तालुकाप्रमुख संजयबापू घोलप यांनी देखील तिव्र नाराजी व्यक्त केली आहे;

