May 23, 2026
IMG-20260523-WA0023

करमाळा_चौफेर

तालुक्यातील चिंचगाव येथील “श्री महादेव मंदिर” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने तब्बल २ कोटी ४९ लाख ९९ हजार ४०३ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . यामुळे यात्रास्थळाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. विकास कामांची अंदाजपत्रके व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून समितीने निधीस मान्यता देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय निधीतून या कामांना मंजुरी दिली आहे.मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये एनएच-१४५ ते सत्संग आश्रम महादेव टेकडी चिंचगाव रोडपर्यंत रस्ता सुधारणा करण्यासाठी ९९ लाख ९९ हजार ४२७ रुपये, सत्संग आश्रम परिसरात काँक्रिट व डांबरीकरणासाठी ९९ लाख ९९ हजार ९७६ रुपये तसेच संरक्षण भिंत बांधण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या विकासकामांमुळे यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध होणार असून परिसराचे सुशोभीकरण आणि सुरक्षिततेतही वाढ होणार आहे. या विकास कामासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता .स्थानिक नागरिकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

टिप – महादेव मंदिर फोटो Ai निर्मित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *