May 3, 2026
IMG-20260502-WA0060

           करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)

करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्नावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत आता खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची थेट एंट्री झाली आहे. दि. 04/05/2026 रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सभागृहात आढावा बैठक होत आहे. पाणीटंचाई निवारण साठी हि तिसरी आढावा बैठक होत असल्याने ‘वाॅटर’ च्या आडूण करमाळ्यात ‘पाॅवर ‘चे राजकारण होत आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी सर्वात आधी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.त्यानंतर दुसरी खेळी – बागल गटाने केली . बागल गटाचे युवानेते दिग्विजय बागल यांनी आपल्या निवासस्थानी सभापती पूजाताई ढेरे व उपसभापती अजित विघ्ने व सर्व सदस्य जिल्हापरिषद सदस्य, यांची बैठक घेऊन पाणी टंचाई प्रश्नावर आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. या बैठकींच्या सिलसिल्यावरून पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बागल गटाला ‘वराती मागून घोडे’ असे मार्मिक टोला लगावलत ‘उशिरा जाग आली, राजकीय फार्स’अशी टीका केली होती.

आता खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची सुद्दा या बैठक सत्रात एंट्री झाली आहे. तहसीलदार कार्यालयाने त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे पत्र काढले आहे.पाणी टंचाई निवारणार्थ हि तिसरी आढावा बैठक करमाळ्यात होणार आहे. जिल्हापरिषद निवडणुकांपासून मोहिते-पाटील व नारायण पाटील गटात सुप्त संघर्ष सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच खासदारांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आमदार ,पाटील, सभापती पूजाताई ढेरे, बागल गटाचे समर्थक, सगळे एकाच व्यासपीठावर येणार का ? या कडे सर्वांच्याच नजरा लागला आहेत. या बैठकीस सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल घेऊन  स्वतः उपस्थित  राहावे प्रतिनिधी पाठवू नये अशा सुचना देखील तहसीलदार यांनी दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *