May 3, 2026
IMG-20260502-WA0058

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)

परिस्थिती गरीब असली तरी स्वप्नं श्रीमंत असावीत’ हे हिवरे (नागोबाचे ) गावचे नवनिर्वाचित PSI अतुल अंकुश विटुकडे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी ‘पोलीस ते पि एस आय’ असे मोठे यश संपादन केले आहे.अतुल विटुकडे यांचे वडील कष्टाळू शेतकरी मात्र दारूचे व्यसन असल्याने घरात सतत किरकोळ कटकटी,मात्र अतुल विटुकडे हे स्वता मात्र माळकरी असून सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचे शिष्य आहेत. २०१८ साली त्यांनी पोलीस भरती होवून खाकी वर्दी मिळवली होती. स्वतः माळकरी, अतिशय शांत स्वभावाचे कुणाशी वाद नाही, व्यसन नाही,शरीरयष्टीने नाजूक त्यामुळे अनेकांनी ‘तू पोलीस खात्यात टिकणार नाहीस’ असं हिणवलं. पण मनाने कणखर असलेल्या अतुलने ‘शरीराने नाही, डोक्याने लढायचं’ ठरवलं .पोलीस सेवेत असताना २०२१ साली आईचे छत्र हरपले ,मात्र आपला मुलगा ‘मोठा साहेब व्हावा हे आईचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते’ अखेर नोकरी संभाळात दोन वर्षांच्या मेहनतीवर त्यांनी MPSC क्रॉस केली असून २७ वी रॅन्क मिळवून यश संपादन केले आहे. एवढ्या तरूण वयात MPSC द्वारे पि एस आय होणारे अतुल विटुकडे हिवरे गावातील पहिलेच युवक ठरले आहेत. वर्दीवर स्टार लागले, पण अतुल विटुकडे यांचे पाय जमिनीवरच आहेत हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.अतुल विटुकडे यांचे माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर हायस्कूल हिवरे व उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे झाले आहे.अतुल विटुकडे यांचे सा .करमाळा_चौफेर च्या वतीने मनःपुर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.

जिद्द व चिकाटी असेल तर यश हमखास-

युवकांमध्ये जिद्द व चिकाटी असेल तर तर तुम्ही कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेऊन यशस्वी होवू शकता. आपल्या ध्येयावर आपले पुर्ण लक्ष ठेवून मी अभ्यास करत गेलो सद्गुरू श्री शिवलाल स्वामी महाराज व आई वडिलांच्या आशीर्वादाने मी यशस्वी झालो आहे. – अतुल विटुकडे ( नवनिर्वाचित पि एस आय).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *