शंभू फरतडे ✍
करमाळा तालुक्यातील हिवरे येथील श्री नागनाथ मंदिर हे हेमाडपंथी बांधकामाचा अतिप्राचीन नमुना म्हणून ओळखले जाते .या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या हस्ते अभिषेक झाला असून श्रिरामचा शिलालेख मंदिर अढळुन येतो.या मंदिरात दर सोमवारी पंचक्रोशीतील शेकडो भाविक दर्शनासाठी येतात तर श्रावणी सोमवार ला राज्यभरासह कर्नाटकातून देखील भाविक हिवरे येथे दर्शनासाठी येतात. या मंदिरावरून या गावाला हिवरे नागोबाचे अशी ओळख पडली आहे.
मंदिर परिसरात दगडी बांधकामातील कोरीवआशा दोन बारवा (विहरी )आहेत .या पैकी एका विहरीला थेट काशी येथील नदिचा झरा आसल्याचे सांगण्यात येथे .या वरुन तिला काशी विहीर मह्णुनओळखले जाते.या विहिरीतील पाण्याचे तुपात रुपांतर झाले होती अशी आख्यायिका असून आजही या विहिरीतील पाण्यावर तेलकट तवंग तरंगतो तर दुसऱ्या विहिरीतील पाणी काचेसारखे चमकते.
मंदिर परिसरीत भव्य आशी चिंचेची झाडे आहेत .पंरडा किल्यावर जाताना छञपती शिवाजी महाराज देखील या ठिकाणी दर्शना साठी येत आसल्याची नोंद आहे. या ठिकाणी शत्रुला चकवा देण्यासाठी केलेले दोन प्रचंड भुयारी मार्ग आहेत. श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी पालखी सोहळा ,भजन ,किर्तन चा कार्यक्रम केला केला जातो .श्रावणातील तिसर्या सोमवारी प्रमुख यात्रा भरते.
या मंदिरा बाबत आधीक माहिती आशी की मुळची घारी (घारापुरी) ता बार्शी येथील आसलेली व हिवरे येथे लग्न होउन आलेल्या वाणी कुटुंबातील महिलेची बार्शी तालुक्यातील घारी येथील नागनाथा वर अपार श्रद्धा होती प्रत्येक सोमवारी हिवरे येथुन घारी येथे दर्शनाला जात आसे .पावसाळ्यात सिना नदिला पुर आसायचा त्या वेळी नदि ओलींडु न या महिलेला जावे लागायचे .वाण्याच्या या महिलेने पाण्यात पाय ठेवला की आपोआप सिनामाईची वाहणारी धार थांबायची आशी आख्यायीका सांगीतले जाते . तिच्या भक्तीला पाहुन नागनाथ महाराज तिच्यासमोर साक्षात प्रकट झाले व तिला हवा तो वर मागण्यास सांगितले .त्यानंतर वाणी समाजातील त्या महिलेने हिवरे येथे येण्याची विंनती केली व तिची हि विनंती मान्य करुन नागनाथ महाराज हिवरे येथे आले आशी कथा सांगीतले जाते .पुढे हि महिला वाणी माता म्हणुन ओळखली जाऊ लागली गावा मध्ये तिचे देखील मंदिर आहे. प्रत्येक दसर्याला सिमोल्लंघन दिवशी देवाची पालखी आपल्या लाडक्या भक्ताला म्हणजे वाणी मातेला भेटण्यासाठी तिच्या मंदिरात आणली जाते.
कुस्त्यांचे भव्य मैदान
श्रावणातील तिसर्या सोमवारी या ठिकाणी कुस्त्यांचा मोठा फड भरतो.पंचक्रोशीतील नावजालेले पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळतात मात्र त्यांना रोख बक्षीसा ऐवजी नारळ दिला जायचा.. या ठिकाणी कुस्ती जिंकली की वर्षभर पैलवान कुठल्या फडावर पाठ दाखवत नाही अशी या मगाची श्रद्धा आहे. त्यामुळे पैलवान पैशाची अपेक्षा न धरता कुस्ती खेळण्यासाठी येत असतात.मात्र पैलवानांचा वाढता खर्च लक्षात घेता सध्या गावकरी मोठ्याप्रमाणात बक्षीस देतात. लोकवर्गणीतून आखाडा देखील बांधला आहे.
कसे याल
बार्शी वरून आलात तर परांडा ते गौंडरे फाटा..उजव्या बाजूने गौंडरे- निमगाव-कोळगाव-हिवरे.
कुर्डवाडी वरून आलात तर -बारलोणी -कव्हे रोपळे, वरकुटे-आळसूंदे- सालसे फिसरे येथून उजव्या बाजुने वळण घेऊन हिसरे – हिवरे..
करमाळ्यावरून येताना – देवीचा माळ -पांडे-फिसरे -मधून डाव्या हाताने वळण घेऊन हिसरे -हिवरे.
