करमाळा_चौफेर (✍️शंभू फरतडे)
हिवरे येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ध्वजवंदन करून सलामी देण्यात आली. जयंती वेळी अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने भाषणं करून आपल्या बोबड्या भाषेत बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला. यावेळेस सर्व समाजबांधव ,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.यावेळेस काळे ग्रुप च्या युवकांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. तसेच अंगणावडीस डाॅ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजीमहाराज यांची प्रतिमा भेट दिली. या साठी काळूराम काळे,अमित काळे,विजय काळे,अरूण काळे यांनी पुढाकार घेतला.
ग्रामपंचायत कार्यालयात देखील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते.

