करमाळा_चौफेर
एक मे महाराष्ट्र दिन कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती, करमाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक: कार्तिकी हौसराव काळे,द्वितीय क्रमांक: शुभांगी संतोष कोंडलकर,तृतीय क्रमांक: यशवर्धन संतोष बनसोडे उत्तेजनार्थ गायत्री शेषराव ओहोळ यांनी घवघवीत यश संपादन केले.
विजेत्या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम,पंचायत समिती सभापती पूजाताई ढेरे, सदस्या श्रीम शिरसकर, उपसभापती अजित विघ्ने, सदस्य भरत भाऊ अवताडे, सदस्य स्वप्नील काळे, तसेच , गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले व सर्व खाते प्रमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदर स्पर्धा गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आल्या.केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ, केंद्रप्रमुख संजय मुंडे, गटसाधन व्यक्ती श्री शेंबडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य, खाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
