करमाळा_चौफेर
निसर्गाच्या रौद्र रूपापुढे माणूस किती हतबल असतो याची प्रचिती देणारी मन हेलावून टाकणारी घटना करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथे घडली आहे. दि ३१ मे रोजी रात्री आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याने शेतातील राहत्या घराची भिंत कोसळून श्री जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) व त्यांच्या पत्नी श्रीमती शालन जगन्नाथ नवले (वय ७५) या वृद्ध दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे.
पोमलवाडी येथील रहिवासी असलेले नवले दाम्पत्य शेतातील घरात वास्तव्यास होते. संध्याकाळी ८\३० च्या दरम्यान प्रचंड वादळी वारे सुरू झाले.किरकोळ कामं करून पती पत्नी जेवण करायला बसली आसतानाच काळाने घाला घातला.
मुख्य रस्ता सोडून एक किलोमीटर घरं असल्याने व जवळपास कोणाची घरे नसल्याने कोणालाच या घटनेचा सुगावा लागला नाही. करमाळा येथे लाँड्री चे दुकान चालवणाऱ्या नातवाने गावत वादळ झाल्याचे समजल्यावर आजोबां आजीना फोन केला परंतू फक्त रिंगटोन वाजत राहिली.
आजोबा फोन उचलत नसल्याने नातू सकाळी सात वाजता करमाळ्यातून पोमलवाडी या गावी गेला तोपर्यंत आठ वाजल्या होत्या नातु घरा जवळ गेल्यानंतर समोरचे चित्र बघून त्याने मोठ्यानं हंबरडा फोडल्यावर आसपासचे मच्छिमार ,शेतकरी गोळा झाले.
सुमारे साडे नऊच्या सुमारास तहसीलदार यांना घटनेची माहिती मिळताच महसूल चे सर्व अधिकरी घटनास्थळी रवाना झाले. यानंतर वृद्ध दाम्पत्यांना करमाळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .तपासणी अंती डाॅक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. दोघांवर शेतात एकाचवेळेस अंत्यविधी करण्यात आला.यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या गावातील अनेक शेतकऱ्यांचे वादळाने नुकसान झाले असून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
