करमाळा चौफेर केम प्रतिनिधी
निधन वार्ता
करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती गंगूबाई विठ्ठल देवकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.
गंगूबाई देवकर यांनी केम ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून सलग दहा वर्षे काम पाहिले होते. गावच्या विकासकामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अत्यंत मनमिळाऊ व सामाजिक कार्याची आवड असलेल्या गंगूबाईंच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सहशिक्षक संतोष देवकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेला सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
‘करमाळा चौफेर’ परिवारातर्फे कै. गंगूबाई देवकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व देवकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो,
