करमाळा_चौफेर
करमाळा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कार्यास सुरुवात झाली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते शिवस्मारक जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
ग्रामदैवत श्री म्हाळसाकांत मंदिरासमोरील पोलीस स्टेशन परिसरातील दर्शनी भागात हे भव्य शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. जेऊर शहर हे आसपासच्या 20 हून अधिक गावांसाठीचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज हजारो नागरिक येथे येत असतात. त्यामुळे युवक, माता-भगिनी व नागरिकांसाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरणार आहे.
“जेऊरमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असावा” हा संकल्प आमदार नारायण आबा पाटील यांच्या मनात आला आणि आज त्याला मुहूर्त स्वरूप देण्यात आले. शासनाच्या नियमावलीचे पालन करून, सर्व विभागांच्या रितसर परवान्यासह येथे पुतळा बसविण्यात येणार आहे.
सदर पुतळा उभारणी व शिवस्मारक कामाची जबाबदारी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच ‘शिवस्मारक निर्माण कृती समितीची’ही स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी सभापती अतुल पाटील, पं.स. सदस्य धनंजय शिरस्कर, माजी सरपंच सुलेमान मुल्ला, चेअरमन संजयकुमार गादीया, जि.प. सदस्य गोडसे, संचालक आबासाहेब अंबारे, रविकिरण फुके, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, हंबीरराव चव्हाण, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, सदस्य उमेश निर्मळ, उमेश मोहिते, उमेश कांडेकर, सागर भगत ,प्रवक्ते सुनील तळेकर इकबाल पठाण, राकेश गरड, संदीप कोठारी, सुयोग दोशी, नवीन दोशी, मुबारक शेख, संतोष वाघमोडे, विनोद गरड,धनंजय घोरपडे, रामभाऊ जगताप, यांच्यासह जेऊरमधील प्रतिष्ठित नागरिक व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
