करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले बालिश बुद्धीचे वक्तव्य शिवप्रेमी कधीच सहन करू शकणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया करमाळा तालुका काँग्रेस (आय) अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केली. बागेश्वरच्या निषेधार्थ आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करमाळा तहसीलदार यांना निवेदन दिले.
या निवेदनात “धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने एका कार्यक्रमांमध्ये इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत चुकीचे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत नसताना असे बेताल वक्तव्य केल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याला महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी ,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी करमाळा पोलिस निरीक्षक यांनाही या निवेदनाची प्रत देऊन धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा जाहीर निषेध करून त्यांना अटक करण्याची मागणी करमाळा तालुका काँग्रेस (आय)च्या वतीने करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव विठ्ठल वाघमारे, काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष सुजय यशवंत जगताप,चंद्रकांत उत्तम साळवे, शिवाजी त्रिंबक आवटे, देविदास रघुनाथ कांबळे, सुदाम संभाजी यादव, बाळनाथ सुखदेव रोडे, प्रतीक संभाजी जगताप, निलेश सुरेश पवार, योगेश सुरेश राखुंडे, सोमनाथ अशोक राखुंडे, नितीन दत्तात्रय चोपडे, अभिमान अर्जुन लष्कर, नितीन मारुती चिंचकर, किरण सूर्यकांत साळुंखे आदी उपस्थित होते.


