August 2, 2026
IMG-20260802-WA0031(1)

करमाळा_चौफेर

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “आदिशक्ती अभियान” मध्ये करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीने ऐतिहासिक यश मिळवले आहे. वाशिंबे ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत डंका वाजवला आहे. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला एकूण चार लाख रुपयांचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.जिल्हास्तरीय पुरस्कार – दुसरा क्रमांक ₹ 3,00,000/- तालुकास्तरीय पुरस्कार – पहिला क्रमांक ₹ 1,00,000/-असे चार लाख रू बक्षिस पटकावले आहे.ही यशस्वी कामगिरी केवळ एका व्यक्तीची नसून संपूर्ण ग्रामपंचायत कुटुंबाच्या एकजुटीचे फळ आहे. अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, बचतगट अध्यक्षा, सी.आर.पी., आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक ऑपरेटर, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे असे सरपंच तानाजी बापू झोळ यांनी सांगतीलेमा. श्री. डॉ. अमित कदम साहेब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच मा. श्री. किरण सूर्यवंशी साहेब, सिडिपियो, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने हा पुरस्कार मिळविण्यात यश मिळवले.वाशिंबे ग्रामपंचायतीने केलेली ही कामगिरी केवळ पुरस्कारापुरती मर्यादित नसून, ही एका सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. भविष्यातही अशाच एकजुटीने कार्य करून आपले गाव स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत व प्रगतशील करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत वाशिंबे परिवार व समस्त ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानून हा पुरस्कार गावाच्या विकासासाठी वापरणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *