July 31, 2026
IMG-20260730-WA0062

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)

करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात Bank of India च्या नावाने सायबर फसवणुकीचे नवे रॅकेट समोर आले आहे. “तुमचे खाते बंद होईल” अशी बनावट नोटीस पाठवून, त्यानंतर APK फाईल डाउनलोड करण्यास सांगून नागरिकांचे WhatsApp नंबर हॅक केले जात आहेत. यामुळे प्रत्येक गावातील WhatsApp ग्रुपवर दररोज असे मेसेज फिरत आहेत आणि फसवणुकीची शक्यता वाढली आहे.BOI च्या लेटरहेडसारखी दिसणारी नोटीस WhatsApp वर येते. त्यात “तुमचे खाते आज बंद होईल” असे लिहून घाबरवले जाते.खाते सुरू ठेवण्यासासठी “KYC अपडेट करा व खाली दिलेल्या APK लिंकवर क्लिक करा” असे सांगितले जाते. हा लिंक हॅकरने बनवलेला असतो.नागरिक APK डाउनलोड करून इंस्टॉल करताच त्याच्या मोबाईलवरील डेटा, संपर्क, OTP, बँक डिटेल्स हॅकरच्या ताब्यात जातात. यानंतर त्या व्यक्तीचा WhatsApp नंबर हॅक होतो.हॅक झालेल्या नंबरवरून BOI चा DP लावून त्याच व्यक्तीच्या नावाने सर्व गावातील ग्रुप आणि कॉन्टॅक्टला तीच बनावट नोटीस आणि APK फाईल पाठवली जाते.गेल्या महिन्यापासून तालुक्यातील अनेक गावातील ग्रुपवर दररोज 2-3 वेळा असे मेसेज येत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक युवक ,अशिक्षित महिला या मेसेजला घाबरून APK डाउनलोड करत आहेत. त्यामुळे आर्थिक फसवणूक आणि ओळखपत्र चोरीचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. या बाबत करमाळा_चौफेर च्या प्रतिनिधींनी स्थानिक बॅंक अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अशा प्रकारे फोन किंवा मेसेज वर बॅंक कोणतीच लिंक अथवा नोटीस पाठवत नाही,नागरिकांनी कोणत्याही फेक मेसेसे काॅल लिंक ला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.●करमाळा_चौफेर चा सल्ला; अशी घ्या खबरदारी● 

Bank of India किंवा कोणतीच बॅंक कधीच WhatsApp वरून APK फाईल पाठवत नाही . कोणतीही लिंक आली तर ती उघडू नये , KYC अपडेट फक्त बँक शाखेत किंवा अधिकृत BOI Mobile App/ वेबसाइटवरूनच करा, OTP, ATM PIN, CVV, पासवर्ड फोनवर कोणालाही सांगू नये . बँक कर्मचारी कधीच मागणार नाहीत.संशयास्पद मेसेज आल्यास तात्काळ बँक शाखेशी संपर्क साधा किंवा टोल फ्री 1800 103 1009 वर कॉल करा. लक्षात ठेवा – एक चुकीचा क्लिक तुमचे खाते रिकामे करू शकतोअनोळखी APK फाईल डाउनलोड करू नका त्यामुळे तुमचा मोबाईल आणि WhatsApp नंबर हॅक होऊ शकतो.बनावट नोटीस/मेसेज आल्यास तो फॉरवर्ड करू नका. तात्काळ डिलीट करा आणि ग्रुप ॲडमिनला कळवा.आर्थिक फसवणूक झाली असेल तर तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा, तक्रारीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी अर्ज द्या किंवा cybercrime.gov.in` वर ऑनलाइन तक्रार नोंदवा. –  रणजीत माने – (पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *