करमाळा_चौफेर (बार्शी प्रतिनधी )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे , युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव मा. वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व विस्तारक शिलवंत साहेब यांच्या माध्यमातून श्री. स्वराज भारत क्षीरसागर यांची युवासेना बार्शी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दै साामना मधून सदरची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे
श्री. स्वराज भारत क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून बार्शी तालुक्यात युवासेना व विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संघटनात्मक काम करत आहेत. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढा देत आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा करणे ,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे,एकल पालक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ,विधवा महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करणे अशा सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्यामुळे त्यांनी युवकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक युवक पक्षाशी जोडले गेले असून संघटन विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नियुक्तीनंतर स्वराज भारत क्षीरसागर यांनी पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे, युवासेना सचिव मा. वरुण सरदेसाई तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विचारधारा तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटित करून पक्ष अधिक बळकट करणे, सामाजिक बांधिलकी जपत जनहिताची कामे अधिक जोमाने राबविणे तसेच बार्शी तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वराज क्षीरसागर यांच्या या नियुक्तीबद्दल शिवसैनिक, युवासैनिक तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
