September 3, 2026
IMG-20260903-WA0050(1)

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज (दादा) जरांगे पाटील यांनी दि. २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणास सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. दादांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असून, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात या समर्थनार्थ सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने उद्या भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.सकल मराठा समाजाने याबाबत तहसीलदार व पोलीस प्रशासनाला जाहीर निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता देवीचामाळ, बायपास रोड, करमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.या निवेदनावर सचिन काळे, अर्जुन जगताप, मारुती कदम, हरिभाऊ हिरडे, राज झिंजाडे,, नितीन खाटमोडे, यांच्यासह समाज बांधवांच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत करमाळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *