करमाळा_चौफेर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडी येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील एकूण 7 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
उत्कर्ष धनाजी पवार,समीक्षा दत्तात्रय मेरगळ,,श्रुती गोरख पवार,समर्थ महेश इरकर,जानवी राजेंद्र इरकर ,प्रज्वल बापू इरकर ,वैष्णवी निलेश इरकर अशी यशस्वी विद्यार्थांची नावे आहेत. नुकत्याच विनोबा तर्फे आयोजित नन्हे सितारे स्पेलिंग बी’ स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी स्वराली राजेंद्र इरकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी वर्गशिक्षक नाना वारे सर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या यशात विद्यार्थी, पालक आणि श्री. नाना वारे सर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
विशेष म्हणजे हेच विद्यार्थी गेल्या वर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देखील सहभागी झाले होते. त्यामुळे “खेळाबरोबर शिक्षण हेच यशस्वी विद्यार्थ्यांचे लक्षण” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
