करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
पुणे, (प्रतिनिधी):
मुंबईतील केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरणात तत्काळ कायमस्वरूपी न्यायाधीशांची नियुक्ती करावी किंवा सर्व प्रलंबित खटले प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग करावेत, अशी आग्रही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केंद्रीय कामगारमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
●19 वर्षे न्याय नाही‘
डॉ. कुचिक म्हणाले, “सध्या या न्यायाधिकरणांमध्ये पूर्णवेळ न्यायाधीश नसल्याने अनेक खटले प्रलंबित आहेत. 2007 साली कामावरून बेकायदेशीर काढलेल्या कामगारांना 2026 उजाडले तरी न्याय मिळत नसेल तर न्यायालयाचा काय उपयोग आहे?”
●गुजरातला वेगळा न्याय का?’
“गुजरात उच्च न्यायालयाने अहमदाबाद येथील दावे राज्याच्या न्यायाधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर आमच्या मागणीवर निर्णय अपेक्षित असताना कामगार मंत्रालयाने संबंधित विभागाकडे प्रकरण पाठवल्याचे सांगितले. असे असेल तर गुजरातला वेगळा न्याय का?”असा रोखठोक सवाल डॉ. कुचिक यांनी केला आहे.
●कामगार मंत्री दखल घेणार का?
कामगार नेते कुचिक यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीची कामगार मंत्री दखल घेणार का ? कामगारांचे खटले जलद गतीने सुटणार का या कडे कामगार बांधवाचे लक्ष लागल आहे.

