करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त करमाळा शहरातील गायकवाड चौकात भव्य पुतळा उभारण्यासाठी करमाळा नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज व सर्वपक्षीय कार्यकर्ते आज एकवटले. नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व मुख्याधिकारी यांना याबत निवेदन देण्यात आले.
अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेले आहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गाव करमाळ्यापासून अगदी जवळ आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचे समाजबांधव जयंतीनिमित्त अभिवादन करण्यास करमाळ्याहून चौंडीकडे जातात. मात्र करमाळा शहरात राजमातांचा पुतळा नसल्याचे शल्य अनेकांना वाटते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“पुतळा बसला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, परंतु अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही,” अशी खंत व्यक्त करण्यात आली.”300 वी जयंती देशभर उत्साहाने साजरी होत असताना करमाळ्यातही पुतळा बसलाच पाहिजे,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली
या प्रसंगी डॉ. श्रीराम परदेशी, गणेश चिवटे, संजय सावंत, संतोष वारे, अमरजित साळुंखे, शंभूराजे फरतडे, हनुमंत मांढरे, जगदीश अग्रवाल, संजय घोलप, शहाजी ठोसर, अभिषेक आव्हाड, सचिन चव्हाण, सचिन काळे, नरेंद्रसिंह ठाकूर, अशपाक जमादार, वनराज घोलप, मस्तकीम पठाण, दिनेश मुथा, आप्पा कोंढारे यांच्यासह सकल धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि मुख्याधिकारी यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले
