May 3, 2026
IMG-20260503-WA0003(1)

              करमाळा_चौफेर (शिर्डी प्रतिनिधी)

साईभूमी शिर्डीत 2 मे 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘महाराष्ट्र साई पद्मश्री’ पुरस्कार सोहळ्यात कायदा व जनसेवेच्या क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय योगदान देणारे करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील सुपुत्र ॲड. सोमनाथ सुभाष कोकरे यांना “महाराष्ट्र साई पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात सामाजिक कार्य, शिक्षण, कला, संस्कृती, प्रशासन, उद्योग, आरोग्य आणि कायदा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील 275 मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील उंदरगावचे सुपुत्र ॲड. सोमनाथ सुभाष कोकरे यांचा समावेश होता.ॲड. सोमनाथ कोकरे यांनी वकिली व्यवसाय सांभाळत समाजहिताचा वसा घेतला आहे. गरजू व वंचित घटकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन, न्यायप्रणालीबाबत जनजागृती, सामाजिक सलोखा व एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. ‘कायदा सर्वांसाठी’ हा मंत्र त्यांनी कृतीतून सिद्ध केला.या पुरस्कारामुळे कोकरे यांचे उंदरगाव व संपूर्ण करमाळा तालुक्यातून अभिनंदन होत आहे. ॲड. कोकरे यांचा सन्मान कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.महाराष्ट्र साई पद्मश्री’ पुरस्काराने त्यांच्या कार्याला मिळालेली ही पावती भविष्यातील सामाजिक बांधिलकीस अधिक बळ देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *