April 25, 2026
IMG-20260425-WA0045

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)

करमाळा विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई निवारणार्थ जेऊर ता. करमाळा येथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. “प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नियोजन केल्यास नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही,” असे मत यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले. या बैठकीस तहसीलदार शिल्पा ठोकडे , गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, माढा तालुक्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे, माढ्याचे नायब तहसीलदार संजय जाधव, माढा तालुका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख उप अभियंता वाघमारे ए.एस. , करमाळा पाणी पुरवठा उप अभियंता वाल्हेकर साहेब, तालुका कृषी अधिकारी नेटके, वनपरिक्षेत्र अधिकारी घोडके (मोहोळ), पशुसंवर्धन अधिकारी यादव यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी आपल्या गावातील संभाव्य पाणी टंचाईबाबत माहिती दिली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी करमाळा तालुक्यातील त्यांच्याकडे प्राप्त गावनिहाय पाणी टंचाईबाबत माहिती देऊन उपाययोजना करण्याबाबतची हमी दिली. आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रशासनाला सतर्क राहून पाणी टंचाई अहवाल तसेच प्राप्त पर्याय याची तपशीलवार माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवून पुढील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीस पाटील गटाचे सर्व आजी /माजी  जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आदिनाथ चे संचालक, माजी सभापती उपसभापती, सरपंच उपसरपं,कार्यकर्त व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार सरपंच विकास गलांडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *