करमाळा_चौफेर :-
करमाळ्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र निकत यांची शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘National Ideal Teacher Awards 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. महेश निकत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, गणित विषयाचे प्रभावी अध्यापन, तसेच MHT-CET, JEE, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा या संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारामुळे करमाळा शहर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव झाला असून, प्रा. डॉ. महेश निकत यांच्यावर विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. डॉ. महेश निकत यांना “National Ideal Teacher Awards 2026” मिळाल्याबद्दल ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परिवार, विद्यार्थी, पालक व हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
