April 25, 2026
IMG-20260426-WA0003

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे✍️)

घोटी/करमाळा

जादूटोणा व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मनोहरमामा भोसले यांचा करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रम कायमस्वरूपी बंद करून सखोल चौकशी करा, अशी लेखी मागणी घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच विलासकाका राऊत यांनी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनोहर भोसले हा गेल्या पाच वर्षांपासून आश्रम चालवत असून सदर आश्रमात अमावस्या, पौर्णिमेला मनोहर भोसले येणाऱ्या लोकांचे भविष्य सांगून जादूटोणा करीत असल्याचे ऐकण्यात आहे.

“सदर आश्रमात राजकीय क्षेत्रातील तसेच वेगवेगळे सेलिब्रिटी लोक वारंवार येत असतात. त्याचप्रमाणे परराज्यातील काही लोक आश्रमात वास्तव्यास आहेत. परंतु आमचे गावातील स्थानिक नागरिक आश्रमात जात नाहीत किंवा मनोहर भोसलेच्या संपर्कातही नाहीत .” “सध्या मनोहर भोसलेवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून कारवाई करण्यात आल्याचे समजते. तेव्हा कृपया मनोहर भोसले प्रमाणेच सदर आश्रमाची देखील सखोल चौकशी करून आश्रम कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी विनंती.” या पत्रातून करण्यात आली आहे.मनोहर मामांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ४८ तासांत ग्रामपंचायत ने आश्रमा विरोधात ठोस भुमिका घेतली आहे.या पत्राची दखल पोलीस प्रशासन घेणार का? या कडे लक्ष लागले आहे. कारण २०१२१ मध्ये करमाळा-इंदापूर सीमेवरील उंदरगाव येथे असलेला भोसलेचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर बंद करण्यात आला होता. त्यावेळीही स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता घोटी येथील २७ एकरावर पसरलेल्या आलिशान आश्रमाबाबत पोलीस काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.कोण आहेत मनोहर मामा भोसले?

●इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी.

●डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता.

●अचानक आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला.व करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता.●साक्षात बाळूमामा अंगात येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.

●अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामांचे फोटो आहेत.

●अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.

●या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.

●कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

●2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपला आश्रम व बुवाबाजी सुरूच ठेवली होती.

न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *