August 3, 2026
IMG-20260803-WA0142

            करमाळा_चौफेर बार्शी /प्रतिनिधी 

    सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.जयकुमार गोरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते मा.संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादाची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बार्शी येथे युवासेनेच्या वतीने आज (सोमवारी) सायंकाळी ६ वाजता शिवसृष्टी येथे मा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.युवासेना बार्शीच्या वतीने बार्शी शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक, युवासैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप, युवासेना समन्वयक हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्तवे केले यावेळी युवासेना राज्य सहसचिव उषा पवार, युवासेना राज्य विस्तारक हेमंत रामगुडे, जेष्ठ शिवसैनिक नवनाथ चोबे,बाळासाहेब मुढे,बापू जाधव,अजित कांबळे,युवासेना जिल्हाप्रमुख पांडुरंग घोलप, हर्षवर्धन पाटील, तालुका प्रमुख स्वराज क्षीरसागर, शैलेश माने, भीमराव गंदुरे, अर्जुन सोनवणे, दिपक कसबे, पंकज भदे, अनिकेत शेरखाने, माऊली डोंगरे, किरण स्वामी, दिपक तिवाडी यांच्या सह युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते.भाजप कार्यकर्ते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी मा.संजय राऊत यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ युवासेनेने दुग्धाभिषेक कार्यक्रम केला असल्याचे आहे. दरम्यान, जयकुमार गोरे आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध ठिकाणी समर्थकांकडून भूमिका मांडल्या जात आहेत. यातच बार्शीतील आजचा दुग्धाभिषेक कार्यक्रमही या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. बार्शी येथील शिवसृष्टी येथे या समर्थनार्थ या कार्यक्रमाकडे बार्शीसह जिल्ह्याचे लक्ष लागले असून मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *