करमाळा_चौफेर
करमाळा मतदारसंघातील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच सर्व कामांना सुरुवात होईल, अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.
विधानपरिषद निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांनी मोहिते-पाटील व राष्ट्रवादी ला डावलून जयकुमार गोरे यांच्यावर विश्वास ठेवत महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत याना सहकार्य केले होते याचे रिटर्न गिफ्ट गोरेंनी दिले असल्याची चर्चा असून भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी गोरें यांच्याकडून सहकार्य लाभू शकते अशी चर्चा आहे.
तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाल्याने नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी विशेष बाब म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. पालकमंत्री गोरे यांनी तातडीने साडेआठ कोटींच्या निधीस मंजुरी देत करमाळेकरांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
या निधीतून एकूण १७ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रत्येक रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे. त्यात समाविष्ट रस्ते पुढीलप्रमाणे:
१. मांगी-पोथरे-निलज सा.क्र. ०/० ते ७/० – पन्नास लक्ष
२. पाथुर्डी ते वरकुटे सा.क्र. ०/० ते १/० – पन्नास लक्ष
३. वीट ते चोपडे वस्ती सा.क्र. ०/० ते ४/० – पन्नास लक्ष
४. आवाटी-नेरले-मुंगशी ते रोपळे सा.क्र. ०/० ते ६/० – पन्नास लक्ष
५. वरकुटे ते साडे सा.क्र. ०/० ते ४/० – पन्नास लक्ष
६. केडगाव ते शेटफळ सा.क्र. ०/० ते ४/५० – पन्नास लक्ष
७. झरे-घाडगे वस्ती ते प्र-१२६ सा.क्र. ०/० ते २/० – पन्नास लक्ष
८. केडगाव-कुष्ठरोग कॉलनी सा.क्र. ०/० ते २/५० – पन्नास लक्ष
९. बोरगाव ते निलज सा.क्र. ०/० ते २/० – पन्नास लक्ष
१०. सौंदे-फिसरे सा.क्र. ०/० ते ३/५० – पन्नास लक्ष
१. कुगाव ते कोकरे वस्ती सा.क्र. ०/० ते १/५० – पन्नास लक्ष
१२. प्ररामा ८ भाळवणी ते केम सा.क्र. ०/० ते १२/० – पन्नास लक्ष
१३. सांगवी ते प्ररामा ८ प्रजिमा १२ ते सातोली सा.क्र. ०/० ते ४/० – पन्नास लक्ष
१४. गोयेगाव ते जोडरस्ता सा.क्र. ०/० ते ३/० – पन्नास लक्ष
१५. खातगाव ३ जोडरस्ता सा.क्र. ०/० ते २/० – पन्नास लक्ष
१६. कामोणे ते रामा १४३ सा.क्र. ०/० ते २/५० – पन्नास लक्ष
१७. निंभोरे ते साडे सा.क्र. ०/० ते ५/० – पन्नास लक्ष
“पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यामुळे करमाळा तालुक्याचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देऊ”, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
