April 18, 2026
IMG-20260418-WA0012

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)

देशात वाढत्या विकृत जिहादी मानसिकतेविरुद्ध, बेकायदेशीर अतिक्रमणांविरुद्ध तसेच सुनियोजित षडयंत्रांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत बजरंग दल करमाळा प्रखंडाच्या वतीने माननीय राष्ट्रपती महोदया यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन करमाळा तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशात सध्या समाजविघातक कारवायांमध्ये वाढ होत असून विकृत जिहादी मानसिकता ही देशाच्या सामाजिक रचनेला आणि अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत आहे. विविध घटनांमधून पुरुषांसोबतच महिलादेखील या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.नाशिक येथील टी.सी.एस. सारख्या प्रतिष्ठित कंपनीच्या परिसरात समोर आलेल्या घटनांचा उल्लेख करत, “लव्ह जिहाद”चे जाळे आता सुशिक्षित व व्यावसायिक क्षेत्रातही पसरत आहे. “कॉर्पोरेट जिहाद” हा नवीन प्रकार असून हिंदूंचे धर्मांतर करणे, तसेच उत्तर प्रदेशातील काही प्रकरणांमध्ये हिंदू मुलींचे शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि सक्तीच्या धर्मांतराचे प्रकार घडल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत, काही जिहादी मानसिकतेशी संबंधित व्यक्तींचा यात सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, देशभरातील विविध शहरांमध्ये सरकारी, खासगी जागा, वन-जमिनी, सार्वजनिक तसेच रेल्वे व लष्करी जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण करून “लँड जिहाद” सुरू असल्याचा दावा निवेदनात आहे.

“फूड जिहाद“च्या माध्यमातून अन्नपदार्थांची विटंबना करून समाजात द्वेष पसरवण्याचे प्रकार सुरू असून नागरिकांच्या धार्मिक भावना व आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच मुस्लिमबहुल भागांमध्ये अल्पसंख्याक हिंदू कुटुंबे व आदिवासी समाजातील मुलींचे शोषण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

●बजरंग दलाच्या प्रमुख मागण्या●

संबंधित घटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी.

सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत

“लव्ह जिहाद” व सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे लागू करावेत.

आदिवासी भागांमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणा उभारावी.

देशातील एकता व अखंडता टिकवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *