June 7, 2026
IMG-20260606-WA0072

करमाळा/संगमनेर (चौफेर प्रतिनिधी )

करमाळा तालुक्यातील मुळ हिवरे गावचे सुपुत्र व वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांना तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.संविधान अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, संघराज दादासाहेब रुपवते, मुकुंद भरसाकळे व तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र घोसाळे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.डॉ. जयसिंह ओहोळ यांच्या आजवरच्या वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. डॉ. ओहोळ यांनी नुकताच “भारतीय संविधान आणि लोकशाही अमृतमहोत्सवी वाटचाल : एक दृष्टिक्षेप” हा अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्या या साहित्यिक योगदानाची देखील पुरस्कार निवड समितीने विशेष दखल घेतली होती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक हितचिंतकांनी, मान्यवरांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी डॉ. जयसिंह ओहोळ यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुळ हिवरे (ता करमाळा) गावच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर झालेला हा सन्मान करमाळा तालुक्यासाठीही अभिमानास्पद मानला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *