April 21, 2026
IMG-20260421-WA0018

करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)

करमाळा नगरपालिका नगरसेवक व गटनेते मा. श्री. संजय (पप्पू) सावंत यांच्या उद्या २२ एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपणारे दोन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून प्रबोधन व शिक्षणाला हातभार लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांच्या वतीने उद्या बुधवार दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ०७ वाजता सावंत गल्ली गार्डन, करमाळा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे”जिवन सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.फुले नको, वह्या-पुस्तके द्या”: कार्यकर्त्यांना आवाहन

वाढदिवसानिमित्त सर्व सावंत कुटुंबावर प्रेम करणारे कार्यकर्ते व नागरिकांना नगरसेवक सावंत यांनी नम्र विनंती केली आहे की, “पुष्पहार, फुले व पुष्पगुच्छ न आणता त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य (वही, पुस्तके, पेन, इ.) देण्यात यावे.” या छोट्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल आणि वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या रूपाने साजरा होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संजय (पप्पू) सावंत हे करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक असून गटनेते, करमाळा शहर विकास आघाडी महणून कार्यरत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सौ मोहिनीताई सावंत सध्या करमाळा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून व्याख्यान व शैक्षणिक मदत या उपक्रमांमुळे सावंत कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांनी केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *