April 21, 2026
IMG-20260421-WA0023

करमाळा_चौफेर

स्वामी चिंचोली व केतूर येथील दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उ‌द्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशसकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, स्कूल डायरेक्टर सौ. नंदा ताटे, सी बी एस ई स्कूल च्या प्राचार्या सौ. वृषाली बागुल, SSC स्कूलच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव, केतूर शाळेचे प्राचार्य श्री. मरकड, सौ. संगीता खाडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सचिव सौ. माया झोळ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत Brain Gym, स्वसंरक्षण आणि अध्यात्म या विषयांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या केवळ बुद्धीचा नव्हे, तर मन आणि व्यक्तिमत्त्वाचाही विकास घडतो. विशेष म्हणजे हे उपक्रम केवळ उन्हाळी शिबिरापुरते मर्यादित नसून दत्तकला शाळांमध्ये वर्षभर सातत्याने राबविले जातात, ही बाब अत्यंत समाधानकारक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाची ठरत आहे.”

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे, तर बौ‌द्धिक, शारीरिक व मानसिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. Brain Gym आणि विविध शारीरिक उपक्रमांमुळे वि‌द्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास व आरोग्य सुधारते. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, शिस्त आणि टीमवर्कची भावना विकसित होते. दत्तकला समूह नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, अशा उपक्रमांद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.”कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच मैदानी खेळ, लाठी-काठी, तलवारबाजी, कराटे, मल्लखांब तसेच स्वसंरक्षणाचे प्रभावी धडे देण्यात आले.

या शिबिरासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची मौल्यवान संधी प्राप्त झाली असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या संपूर्ण शिबिराचे नियोजन डॉ. संतोष मचाले सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *