करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍🏻)
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपल्या मुलांना कर्तृत्ववान बनवणाऱ्या एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी अर्जुननगर ग्रामपंचायतीने साजरा केलेल्या ‘एकल महिला दिन’ सोहळ्यात सन्मानित झालेल्या मातांच्या मुलांची कामगिरीही चर्चेचा विषय ठरली.
सरपंच सौ सोनाली ढवळे ,जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी काटकर, माजी सरपंच अश्विनी थोरात, चंद्रकला भोगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ज्यांचा गौरव झाला, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याचे त्यांच्या मुलांच्या यशातून दिसून आले.
●👇🏻सन्मानित मातांच्या कर्तृत्ववान मुलांची यादी👇🏻●
१ चंद्रकला भोगे -मातेच्या त्यागातून घडलेल्या त्यांच्या मुलाने करमाळा येथे गुरुकुल पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. आज ही शाळा तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक मानली जाते.
२ लता भोगे : कष्टाने घडवलेल्या त्यांच्या मुलगा अजय भोगे स्टेट बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे आरोग्य विभागात सेवेत आहे.
३ गुलचाबाई आडसुळ : त्यांच्या तीन मुलांनी गावातच शेती, किराणा दुकान, दूध संस्था आणि हॉटेल व्यवसायात नाव कमावले आहे. सर्व मुले एकत्र कुटुंबात राहून मातेचा आधार बनली आहेत.
४. मनिषा शिरवाळे : संघर्षाच्या बळावर त्यांच्या एका मुला-मुलीने उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळवली असून, ते आपले शैक्षणिक ध्येय पूर्ण करत आहेत.
५ साखरबाई दामू शिंदे – यांनी आपल्या पाच मुलिंची थाटात लग्न केली मुलगा शंकर शिंदे सध्या गावात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात.
या मातांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती मिळताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सन्मान केला,जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काटकर म्हणाल्या, “हीच खरी आईची ताकद आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी मुलांना शिक्षणाची जोड दिली की यश आपोआप येते”. उपसरपंच अमोल पवार यांनी ग्रामपंचायत एकल महिलांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.
ग्रामपंचायत अधिकारी मनोज लटके यांनी संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांची माहिती दिली, तर बचत गट प्रवर्तक सुरेखा घाडगे यांनी आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गटाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला नटराज भोगे, अभिमन्यू धुमाळ, त्रिंबक ननवरे, नवनाथ पवार, कैलास पवार, सुनील लोखंडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
सूत्रसंचालन व ग्रामसेवक मनोज लटके भाऊसाहेब यांनी तरउपस्थितांचे आभार सरपंच प्रतिनिधी बापुराव ढवळे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचत गटाच्या महिला ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
